Covishield : कोरोना काळात जगभरात कोव्हिशिल्ड लस (Covishield Vaccine) टोचून घेतली आहे, त्यांच्यापैकी काहीजणांना त्याचे दुष्परिणाम जाणवत असल्याचे समोर आले आहे. अॅस्ट्राजेनेका (AstraZeneca) या कंपनीने देखील काही दुष्परिणाम होऊ शकतात असे ब्रिटनच्या न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड (covishield) लशीचे दुष्परिणाबाबत जगभरात भीती व्यक्त केली जात आहे. अशात आता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना साथीच्या काळात भारतीयांसाठी वरदान ठरलेल्या कोव्हिशिल्ड लशीबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु आहे. आता कोव्हिशिल्ड लस बनवणाऱ्या अॅस्ट्राजेनेका (AstraZeneca) या कंपनीकडून जगभरातून कोविड १९ ची लस मागे घेण्यास सुरुवात केली असून व्यावसायिक कारणास्तव ही लस बाजारातून मागे घेत असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. याआधी कोव्हिशिल्ड लशीचे दुष्परिणाम होवू शकतात असे कागदपत्रांतून कंपनीने न्यायालयासोर मान्य केले होते.
गेल्या काही दिवसांमध्ये कोव्हिशिल्ड लशीचे दुष्परिणाम भोगलेल्या अनेकजणांची उदाहरणे समोर आली आहेत. ब्रिटनमध्ये यावरुन न्यायालयात वाद सुरु आहे. लशीमुळे टीटीएस म्हणजेच थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम हा आजार होऊ शकतो. या आजारात शरीरात रक्ताच्या गुठळ्या आणि प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यामुळे अनेकांचा मृत्यू होऊ शकतो, असे अॅस्ट्राजेनेका कंपनीने म्हटले होते. त्यापैकी अनेक रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची बाब समोर आली होती.
Covishield ची विक्री केली जाणार नाही
दरम्यान, अॅस्ट्राजेनेका या कंपनीकडून जगभरातून कोविड १९ ची लस मागे घेत असून व्यावसायिक कारणामुळे यापुढे लशीची निर्मिती अथवा विक्री केली जाणार नाही असे कंपनीने जाहीर केले आहे.
हे ही वाचा :
प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांचे मोठे विधान
राज्यात ११ मतदारसंघात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान
बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप
‘EVM’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास अटक
TMC : टाटा स्मारक हॉस्पिटल येथे भरती
मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे
Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड
Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल