आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील महानगाव निघोजे पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे उद्घाटन खासदार डॉ, अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे यांचे प्रमुख उपस्थितीत झाले. (Alandi)
या प्रसंगी खासदार अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, अल्ट्रा टेक कंपनीचे समीर भोसले, यश भोसले, प्रमोद भोसले, विनायक शितोळे, दिनेश बागडे, दादासाहेब गोरे, राहुल बागवे, वासुदेव शर्मा, संग्राम पाटील, प्रतिक गोखले, अश्विनी हसबे, क्रेंद्र प्रमुख हिरामण कुसाळकर, निघोजे ग्रामपंचायत सरपंच सुनिता येळवंडे, उपसरपंच मनिषा बेंडाले, सदस्य अजित येळवंडे,सागर येळवंडे, समाधान येळवंडे, दत्ता आंद्रे, दिपक कांबळे, कोंडीभाऊ येळवंडे, प्रियांका आल्हाट, इंदिरा फडके, छाया येळवंडे, रुपाली येळवंडे, अलकाबाई येळवंडे, स्नेहा फडके आदी मान्यवर उपस्थित होते.
महानगाव निघोजे ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम असुन महानगाव निघोजे येथील गायरान जमीन मिळाली तर विशेष निधीमधून शाळा, महाविद्यालये तसेच प्रशासकीय इमारत विकासित करण्यात येईल. यासाठी म्हणून जमीनीसाठी लोक नियुक्त सरपंच सुनिता येळवंडे यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार बाबाजी काळे यांच्याकडे साकडे घातले आहे. (Alandi)
बाळासाहेब घाटे यांनी सुत्रसंचलन केले. मुख्याध्यापक कृष्णदेव काटकर यांनी प्रास्ताविक केले, या प्रसंगी ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे ही वाचा :
अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन
जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !
चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली
मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !