पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर ) : श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, शिवतेजनगर यांच्या दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन श्री स्वामी समर्थ सेवेतील ३२ वर्षांचा प्रगल्भ अनुभव असलेले आध्यात्मिक गुरू श्री संजय तळोले यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे गुरुवार दिनांक २ जानेवारी रोजी करण्यात आले. (PCMC)
सदर कार्यक्रम प्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक श्री नारायण बहिरवाडे, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष राजू गुणवंत, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक हरिणारायन शेळके, महिला मंडळ अध्यक्ष क्षमा काळे आणि महिला मंडळ कार्याध्यक्ष सारिका रिकामे व युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्नील बनकर, प्रसिद्ध निवेदक राजेंद्र घावाटे,दिगंबर थोरात, महेंद्र शेळके, किशोर थोरात आदी उपस्थित होते. (PCMC)
प्रतिष्ठान च्या वतीने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले असून याचा जास्तीत जास्त सेवेकरी वर्गाला लाभ मिळणार आहे असे श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक श्री नारायण बहिरवाडे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रम प्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना प्रतिष्ठानची परंपरा अशीच दर वर्षी चालू राहील याची ग्वाही सर्वांनी दिली.
या प्रसंगी अध्यात्मिक गुरू संजय तळोले यांनी या दिनदर्शिकेचे माध्यमातून साजरे केले जाणारे सर्व सण, वार, मुहूर्त आशा अनेक गोष्टींची माहिती या दिंदर्शिकेत दिलेली असून याचा लाभ सर्व सेवेकरी वर्गाला होणार असून आशा प्रकारची समाजसेवा ही प्रतिष्टान मार्फत श्री नारायण बहिरवाडे सदैव करत असतात असे सांगितले.
श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, जेष्ठ नागरिक संघ,महिला मंडळ व युवा प्रतिष्ठान तर्फे आशा प्रकारचे विविध कार्यक्रम हे वर्षभरात राबविले जातात व परिसरातील भाविकांना याचा लाभ मिळत असतो,एकदा चालू केलेली सेवेची परंपरा ही दर वर्षी अविरत चालू ठेऊन त्याचा खंड पडत नाही हि या श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान ची ख्याती आहे तर यामध्ये दरवर्षी दत्तजयंती उत्सव,स्वामी समर्थ प्रकट दिन, गुरू चरित्र पारायण सोहळा, स्वामी चरित्र पारायण सोहळा, दिवाळी पहाट आशा अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे.
परिसरातून भाविक भक्तांनी या प्रकाशित केलेल्या दिनदर्शिके चा लाभ आपले नाव श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे नोंदवून लाभ घ्यावा अशी घोषणा प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आली.
हे ही वाचा :
अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन
जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !
चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली
मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !