आंबेगाव,(दि.२९) : पंचाळे खुर्द ता.आंबेगाव येथील तरुणांनी कौतुकास्पद कामगिरी करत, चोरी झालेली टुव्हीलर मूळ मालकाला सुपूर्द केलेली आहे.
पंचाळे खुर्द परीसरात नवीन स्पेलंडर गाडी अज्ञातांनी चोरी करुण दगड नळीच्या झूरीत ढकलून दिली होती. गावातील तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी ती सुरक्षित बाहेर काढली. व्हाट्सएपच्या माध्यमातून लक्षात आले की, ती गाडी नारोडी गावचे सरपंच यांची आहे. दरम्यान त्याच्याशी संपर्क साधुन काल (दि.२८) त्यांच्याकडे ही गाडी पोहच केली आहे. गाडी फेकून दिल्यामुळ तिची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे.
यावेळी गावातील तरुण मंडळाचे समीर बांबळे ,नितीन डामसे, गणेश रावळ,दशरथ रावळ,प्रशांत डामसे ,पुरुषोत्तम गारे आदी. तरुणांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.