Friday, May 3, 2024
Homeजिल्हाआदिवासी वाडीची पायवाट केली बंद, पायवाट खुला करण्याची मागणी

आदिवासी वाडीची पायवाट केली बंद, पायवाट खुला करण्याची मागणी

दापोली : शिरखल आदिवासीवाडीची पायवाट यशवंत चव्हाण यांनी बंद केली आहे, ती पायवाट ग्रामस्थांच्या व शाळकरी मुलांच्या येण्या जाण्यासाठी तात्काळ खुली करून द्यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स व आदिवासी आदिम कातकरी संघटना दापोलीच्या वतीने दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, जिल्हा कार्याध्यक्ष संदिप पवार, आदिवासी आदिम कातकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विठोबा जगताप, सचिव महेश वाघमारे, शंकर पवार, सचिव वाघमारे, विश्वास वाघमारे, किसन जगताप, जानू पवार, दिपक वाघमारे, राजा वाघमारे, किसन जाधव, अंकुश वाघमारे, दौलत पवार, विजय वाघमारे, प्रकाश जगताप, जनी निकम, मंगेश निकम, भरत वाघमारे, सागर पवार, रमेश निकम, गणेश पवार, योगेश वाघमारे, संतोष निकम इत्यादी आदिवासी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी 15 मिनिटे चर्चा करण्यात आली. संबंधित गावाचे तलाठी व सर्कल यांना सूचना देऊन रस्त्याचा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन तहसीलदार दापोली यांनी दिले. शिरखल आदिवासीवाडी येथे वाडवडिलांच्या वंशपरंपराने गेली अनेक वर्ष सदर ठिकाणी राहत आहोत.तेव्हापासून आम्ही सदरील राहत असलेल्या शिरखल आदिवासीवाडी ते पालगड मुख्य रस्ता अशी वंशपरंपराने वहिवाट असलेल्या पायवाटेने आम्ही वाडीतील ग्रामस्थ ये जा करीत आहोत.

परंतु आता यशवंत चव्हाण रा.कोर्टीवाडी पालगड यांचे जमिनीतून जाणारी सदरची वंशपरंपरागत सुरू असलेली पायवाट त्यांनी अचानक बंद केली आहे. त्यामुळे आमच्या ग्रामस्थांची गैर सोय होत आहे. आमच्या मुलांना शाळेत येणे जाणे, आदिवासीवाडीतील ग्रामस्थांचे दररोजचे व्यवहार हे अत्यंत जिकरीचे झालेले आहेत. चव्हाण हे सदरची पायवाट वारंवार बंद करत असतात आणि आम्हाला सदरच्या पायवाटेव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्यायी रस्ता अथवा पायवाट नाही. तरी आपण सदर प्रकरणामध्ये लक्ष घालून सदरची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने यशवंत चव्हाण यांना आवश्यक त्या सुचना द्याव्यात. सदरची पायवाट पूर्ववत सुरू आहे. त्याप्रमाणे ती पायवाट आदिवासीवाडीतील ग्रामस्थांसाठी खुली करून द्यावी, अशी मागणी शिरखल आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी तहसीलदार दापोली यांच्याकडे केली आहे.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय