Wednesday, January 15, 2025
Homeराज्यपुणे - नाशिक हायस्पीड रेल्वेच्या भू - संपादनास वेग

पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वेच्या भू – संपादनास वेग

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-संगमनेर-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या दराबाबत संबंधित गावांत जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.

याबाबत रेल्वे प्रकल्पाची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतली. यावेळी जिल्हा भूसंपादन अधिकारी संदीप चव्हाण, रेल्वेचे महासंचालक राजेशकुमार जयस्वाल, अप्प महाव्यवस्थापक सचिन कुलकर्णी, व्यवस्थापक गुंजाळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे मंत्रालयाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून पुणे-नाशिकचे अंतर कमी करण्यासाठी हा रेल्वे प्रकल्प प्रस्तावित असून येत्या ३ वर्षांत हा मार्गी लावयाचा आहे. पुणे-संगमनेर-नाशिक हायस्पीड रेल्वे ही नगर जिल्ह्यातील २६ गावांतून जात आहे. या भागातील रेल्वेची लांबी ७० किलो मीटर आहे. यासाठी ३०० हेक्टर जमीन संपादित होणार आहे.

केंद्र सरकारच्या निधी आयोगाने या प्रकल्पासाठी निधी मंजूर केला असून संगमनेर तालुक्यातील २६ गावांतील ११ हजार ९५० शेतकऱ्यांच्या जमीनी या प्रकल्पासाठी भूसंपादीत होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संपादित होणाऱ्या जमिनीची यापूर्वीच रेल्वे आणि महसूल विभागाकडून संयुक्त मोजणी झालेली आहे. त्यानंतर मागील महिन्यांत भूसंपादित होणाऱ्या गावातील काही शेतकऱ्यांना नगरला बोलविण्यात आले होते. त्यावेळी प्राथमिक बैठक झाली होती.

संबंधित लेख

लोकप्रिय