Sunday, May 5, 2024
Homeग्रामीणख्रिश्चन दफनभूमीचा जलदगतीने विकास करा, माकपच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर तीव्र आंदोलन.

ख्रिश्चन दफनभूमीचा जलदगतीने विकास करा, माकपच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर तीव्र आंदोलन.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील एकमेव असलेल्या शहरातील समिराबाग, खडकपूरा येथील ख्रिश्चन दफनभूमीचा प्रश्न गंभीर बनल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज नांदेड जिल्हाधिकारी यांचे कार्यालयासमोर दोन तास धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनामध्ये ख्रिश्चन दफनभूमीसाठी मनपा हद्दीमध्ये दहा एकर जमीन उपलब्ध करून देण्यात यावी व सद्यस्थित असलेल्या समिराबाग येथील दफन भूमीत पडझड झाली असून तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, दफनभूमीत अंतर्गत रस्ते, वीज, पाणी व शौचालय निर्माण करण्यात यावे, मागील सात वर्षापूर्वी पासून तुटपूंज्या मानधनावर कार्यरत असलेले कर्मचारी पांडुरंग वाहूळे यांना मनपाने सेवेत कायम करून त्यांना किमान वेतन देण्यात यावे, 

दफनभूमीत वाढलेली काटेरी, विषारी झाडे झूडपे तोडून साफ सफाई करण्यात यावी, दर तीन महिन्यांनी मनपाच्या वतीने झाडे झूडपे तोडण्यात यावेत, पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे तात्काळ ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि उपायुक्त मनपा यांना निवेदन देऊन शिष्ठमंडळाने चर्चा करून निवेदन दिले. निवेदन देताना माकप शहर सचिव कॉ. गंगाधर गायकवाड म्हणाले की, अल्पसंख्यांक असलेल्या ख्रिश्चन समुदायाच्या मागण्या प्रशासनाने लवकरात लवकर सोडवाव्या अन्यथा या पुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

आंदोलनाचे नेतृत्व कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे, कॉ.रविन्द्र जाधव, सॕम्यूअल नागूरे, कॉ.दत्तोपंत इंगळे, कॉ.सं.ना.राठोड, आनंद माने, स्वामीदास बेदरे, विलास कांबळे, अतीष वेलूरकर, लक्ष्मीबाई दर्शनवाड, पंचफूलाबाई संगे, विद्याबाई कळसे, मारोती आडणे, अलफ्रेड जेकब, प्रेम वळसनकर, जेम्स स्वामी आदींनी केले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय