Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरीमध्ये आप तर्फे महागाई विरोधात निदर्शने

पिंपरीमध्ये आप तर्फे महागाई विरोधात निदर्शने

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवडच्या वतीने दिनांक ९ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी चौक येथे महागाईच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. 

देशभरामध्ये इंधन दरवाढीचा भडका उडाला असून दैनंदिन जीवनातील वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. करोना महामारीच्या आसमानी संकटातून कसेबसे सावरलेल्या सामान्य जनतेला शासन पुरस्कृत महागाईच्या सुलतानी संकटाने जेरीस आणले आहे.  म्हणून सामान्य जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करत असल्याचे आपचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले. 

संतापजनक ! भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या दिल्या म्हणून पत्रकारांना पोलिसांकडून नग्न करून मारहाण

पुढे ते म्हणाले की मोदी सरकारच्या धोरणामुळे भारत जगभरात क्रमांक एकवर आला आहे परंतु हा क्रमांक विकासाचा नसून देशाला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या इंधन दरवाढीचा आहे, जगभरात पेट्रोल डिझेल वर सर्वात जास्त २५०% टक्के कर भारत सरकार वसूल करत आहे, जगातील सर्वात महाग LPG आपल्या देशातच मिळत आहे. त्यामुळे दैनंदिन वस्तूंच्या किमती  सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्याचे वैजनाथ शिरसाठ यांनी सांगितले.

प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जनतेला दिलासा मिळेल असा कोणताही निर्णय घेतला नाही. याउलट केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरण लकव्यामुळेच सामान्य जनता महागाईच्या बोजाखाली चिरडली जात आहे. म्हणून आम आदमी पार्टी जनतेच्या प्रश्नावर सरकार विरोधात निदर्शने करत आहे. नरेंद्र मोदींच्या एक देश एक कर घोषनेनुसार पेट्रोल-डिझेल, गॅस हे GST अंतर्गत आणून सामान्य जनतेला महागाईतून तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी आपचे प्रवक्ते प्रकाश हगवणे यांनी केली.

मोठी बातमी : गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी, तर कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

याप्रसंगी यशवंत कांबळे, पांडुरंग फुंदे, मंगेश आंबेकर, वैजनाथ शिरसाठ, ब्रह्मानंद जाधव, अशोक तनपुरे, शांताराम बोऱ्हाडे, ऍड. गौतम कुडुक, मोतीराम अगरवाल, अमर डोंगरे, जावळे मामा, नाजनीन मेनन इत्यादी आपच्या पदाधिकाऱ्यांनी महागाई विरोधात प्रातिनिधिक स्वरूपात निषेध व्यक्त केला.

या वेळी आपचे वहाब शेख, रोनक होनराव, विजय अब्बाड, अशोक कोठावळे, रोहन सौदागर, लक्ष्मण माने, विशाल साळवे, तेजस गवळी, शंकर कांबळे, तोसिफ चौधरी, निखिल बालीघाटे, प्रदिप सूर्यवंशी, शिवा बोटे, विकास गायकवाड, शुभम वाटमारे, स्वप्निल जेवळे, ऍड. अवकाश यादव, सरोज कदम, आशुतोष  शेळके, महादेव गायकवाड, सद्दाम  पठाण, सायली केदारी, महेश केदारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

संतापजनक ! सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

ब्रेकिंग : पोलिस प्रशिक्षण केंद्रातील तब्बल ६९ जणांना जेवणातून विषबाधा

१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय