Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAAP PCMC : सिता केंद्रे यांच्या नेतृत्वात स्वराज्य संवाद सभा जाधववाडी येथे...

AAP PCMC : सिता केंद्रे यांच्या नेतृत्वात स्वराज्य संवाद सभा जाधववाडी येथे संपन्न

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : आम आदमी पार्टीच्या वतीने चिखली जाधववाडी येथील, भाजी मंडई शेजारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोर आपच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्वराज्य संवाद कोपरासभा संपन्न. नुकतेच काही दिवसापूर्वी आम आदमी पार्टीने पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा काढली होती या यात्रेला जनतेचा भरघोस असा प्रतिसाद मिळाला या पार्श्वभूमी वरती जाधववाडी प्रभागामध्ये स्वराज्य संवाद कोपरा सभा झाली या प्रभागातील आम आदमी पार्टीच्या इच्छुक उमेदवार सिताताई केंद्रे या प्रभागातुन इच्छुक उमेदवार आहेत, यावेळी बोलतांना सिताताई केंद्रे यांनी प्रभागातील अनेक समस्यांची पोलखोल केली, त्यांनी सांगितले आम आदमी पार्टीची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता आल्यास महापालिकेत उच्चदर्जाच्या शाळा, दररोज मोफत पाणी देण्यात येईल, महिलांसाठी बस फ्री करण्यात येईल, शास्तिकराचा विषय कायमचा मार्गी लावण्यात येईल असे त्यांनी म्हटले.



गेली वीस वर्षे सिताताई केंद्रे त्याप्रभागांमध्ये सामाजिक कार्य करत आहेत, त्यांना स्थानिकांसह ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा या भागांमधून आहे. त्या संघर्ष मित्र मंडळ ट्रस्ट अध्यक्षा आहेत. त्यांना आम आदमी पार्टीने पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष ही जबाबदारी नुकतीच देण्यात आलेली आहे. आपचे पिंपरी चिंचवड शहर युवा अध्यक्ष रविराज काळे यांनी आम आदमी पार्टी स्वराज्य संवाद यात्रा पंढरपूर ते रायगड काढण्यात आली व संवाद यात्रेतील अनेक किस्से आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी बोलून दाखवला. आम आदमी पार्टी महाराष्ट्र मध्ये येणाऱ्या काळात मोठ संघटन उभे करायला असं त्यांनी सांगितले. यावेळी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर सक्रिय सदस्य वैजनाथ शिरसाट यांनी बोलतांना म्हटले महागाईने जनता मेटाकुटीला आलेली आहे येणाऱ्या काळात ही जनता भाजपला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी म्हटले, यावेळी त्यांनी दिल्ली आणि पंजाब येथील आप सरकारचे उल्लेखनीय कामगिरी व योजना जनतेसमोर मांडल्या.

या वेळी आपचे मा.प्रवक्ते प्रकाश हगवणे बोलतांना म्हटले एकेकाळी श्रीमंतीचा रुबाब असणारी महानगरपालिका सत्ताधार्यांच्या कोट्यावधीच्या घोटाळ्यामुळे भिकेचे डोहाळे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ताधारी आणि विरोधक आणि प्रशासक या महानगरपालिकेमध्ये यांचे लागेबांधे आहेत. अंदर की एक बात है हम सब एक है अशाप्रकारे विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांच्या हातात हात घालून फिरत असतात. अनेक कामाच्या निविदा वाजवी दरात करून त्यामधून टक्केवारीचे गणित सांभाळणे हा उद्योग ह्या महानगरपालिकेमध्ये सर्रास चालू आहे. अनेक कंत्राटदार महानगरपालिकेच्या कामामुळे गर्भ श्रीमंत झाले आहेत. आपची महापालिकेत सत्ता आली तर हा भ्रष्टाचार मोडीत काढला जाईल.

या वेळी आपचे कार्यकर्ते प्रमोद लाड व आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शब्दात भाजप सरकारचे वाभाडे काढले. यावेळी आम आदमी पार्टीचे , सुरेश बावनकर, सुनील शिवशरण, बालाजी कांबळे, ओम डांगे, दत्तात्रय सांगवे, मेघा गरिबे, भाग्यश्री टोम्पे, प्रथमेश बोरुळे, सुरेश कांबळे, अनिल टाकळे, राहुल कांबळे, सुजित रजपूत ,आकाश कवठेकर , तुकाराम इंगोले , गुलाब कांबळे ,शिवराज इंगोले ,विष्णू घोरवाड, वैभव कौशल्य, राजू इंगोले, वैभव इंगोलेळ, गजू इंगोले, साईनाथ इंगोले, मधुकर काउटकर, देवी इंगोले, प्रभाकर इंगोले, विठ्ठल सावंत, पवन इंगोले, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माया सांगवे यांनी आभार व्यक्त केले

महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये


Video : सिक्कीममध्ये भयंकर भूस्खलन झाल्याने रस्ते बंद, जवानांकडून ३५०० पर्यटकांची सुटका


ब्रेकिंग न्यूज : MPSC मध्ये राज्यात तिसरी, पण मित्रासोबत फिरायला गेली अन् घात झाला ; वाचून हादराल

संबंधित लेख

लोकप्रिय