Saturday, May 18, 2024
HomeNewsबापरे ! चक्क दाढीने उचलली महिला.

बापरे ! चक्क दाढीने उचलली महिला.

दातांनी ट्रेन खेचणे, कानाने ट्रक ओढणे असे विक्रम जगाच्या पाठीवर अनेक झालेले आहेत; मात्र एका व्यक्तीने जो विक्रम केला आहे तो खरोखरच अनोखा म्हणावा लागेल.

या माणसाने चक्क दाढीच्या सहाय्याने 63.80 किलो वजनाच्या महिलेला उचलून दाखवले होते. त्याचा व्हिडिओही गिनिज बुकने प्रसिद्ध केलेला आहे.

या माणसाचे नाव आहे अँटानास कोंट्रीमास. ‘मुंछे हो तो नत्थुलाल जैसी हो’ हा डायलॉग या माणसाबाबत ‘दाढी हो तो अँटानास जैसी हो’ अशा पद्धतीने म्हणावा लागेल. या व्हिडीओत दिसते की, ही महिला एका बॅगमध्ये झोपलेली आहे आणि ही बॅग या माणसाने दाढीने उचलली.

गिनिज बुकने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अँटानास कोंट्रीमासने आतापर्यंतचे सर्वाधिक वजन दाढीने उचलले.’ त्यावरून या वयस्कर दिसणार्‍या माणसाची पिकलेली दाढीही किती मजबूत आहे हे दिसते. लोकांनी अर्थातच या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय