नांदेड : बाल मित्र गंगाधर गायकवाड आणि रमेश चाटे यांची तब्बल 27 वर्षांनी भेट झाली. या भेटीने दोघांचेही मन भरुन आले.
गंगाधर गायकवाड म्हणाले खोडकर पण अत्यंत प्रेमळ आणि तेवढाच भाऊक असेलेला बालमित्र रमेश चाटे. आता मुंबई येथे वास्तव्यास असून रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. किनवटच्या शासकीय वस्तीगृहातील रूममेट आणि कॉस्मोपॉलिटन शाळे मधील हे दोघे क्लासमेट.
हे दोघेही स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे त्या काळातील सदस्य आणि जीवलग मित्र. दहावी नंतर फाटाफूट झाली आणि आज तब्बल सत्तावीस वर्षानंतर नांदेड येथे भेट झाली.
साधारणतः पावणेतीन दशकानंतर यांची भेट झाली व दोघेही भारावून गेले. जुन्या आठवणी काढून पुन्हा किनवटच्या बालआठवणीत घेऊन गेले. वेळे अभावी जास्तवेळ सोबत राहू शकले नाही, मात्र आजचा दिवस मात्र खूपच आनंदाचा ठरला.