घोडेगाव : आदिम संस्कृती अभ्यास,संशोधन व मानव विकास केंद्र संचलित व आदिवासी सेवक शंकर विठू केंगले यांच्या स्मृतीपर सुरू असलेल्या, ज्ञानसरिता अभ्यासिकेच्या वतीने घोडेगाव येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. A thorough and comprehensive reading is essential – Mahesh Gargote
यावेळी, घोडेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व विविध स्पर्धा परीक्षा विषयक पुस्तकांचे लेखक महेश गारगोटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

जुन्नर फाटा, घोडेगाव येथे मागील ६ महिन्यापूर्वी आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र यांच्या वतीने व ललित कला मंदिर विश्वस्त निधी पुणे यांच्या सहकार्याने ज्ञानसरिता अभ्यासिका सुरु करण्यात आलेली आहे. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यावर कशापद्धतीने मात करावी, यासाठी या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महेश गारगोटे यांनी सांगितले कि ‘प्रामाणिकपणा,कष्ट आणि निरंतर अभ्यास केला तर विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतात. यासोबतच प्रत्येकाने सखोल वाचन करणे किती आवश्यक आहे याची ही कल्पना यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले राजू घोडे यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि, ‘विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे, हे वाचन करत असताना विद्यार्थ्यांनी निसर्ग, समाज व आपल्या सभोवतालच्या परिसरात घडणाऱ्या घटना देखील वाचायला हव्यात.

यावेळी आदिम संस्थेचे समीर गारे, एसएफआय आंबेगाव तालुका समितीचे अध्यक्ष दिपक वालकोळी, सहसचिव योगेश हिले, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या स्थानिक संयोजनात, एसएफआय आंबेगाव तालुका समितीने पुढाकार घेतला होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रीना मुंढे यांनी केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल वाकचौरे व रोहिदास फलके यांनी आभार मानले.
NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 823 पदांच्या रिक्त जागा भरती
Karnataka Bank : कर्नाटक बँकेत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज

