Sunday, May 19, 2024
Homeराज्यआशा व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढीचा प्रस्ताव शासनास सादर

आशा व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढीचा प्रस्ताव शासनास सादर

मुंबई : आशा व गटप्रवर्तकांनी महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा व तिव्र निदर्शने केली. त्याला प्रतिसाद देत सबंध महाराष्ट्रातून आज आझाद मैदानावर आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांची प्रचंड ताकद उतरवली.

राज्य सरकारने भरीव मोबदल्यात वाढ द्यावी, नवीन मोबाईल फोन, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यात सामावून घ्यावे, आरोग्यवर्धिनी मध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करावा, गटप्रवर्तकांना स्कूटर द्यावी, आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्याबाबत समिती गठीत करावी, दिवाळी बोनस द्यावे, केंद्र व राज्य निधीमधून दिला जाणारा मोबदला दरमहा पाच तारखे पर्यंत नियमित व एकत्रित देण्यात यावा.

आजच्या कृती समितीच्या मोर्चामुळे आरोग्य विभागाकडून डॉ.पी.एम.पाडवी सहसंचालक, श्रीमती स्वाती पाटील आशा कार्यक्रम अधिकारी यांनी आझाद मैदानावर येऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा दीड हजार रुपये वाढीचा प्रस्ताव शासनास सादर केला असल्याचे सांगितले. त्यावर कृती समितीने गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात आणखी वाढ करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यानुसार सुधारित प्रस्ताव शासनास सादर करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

कृति समितीच्या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, लातूर ग्रामीणचे आ. धीरज देशमुख, कोल्हापूर चे आ. पी.एन पाटील, रावेर चे आ. शिरिष चौधरी, पुरंदर चे आ. संजय जगताप, देवानंद पवार यांनी जाहिर पाठिंबा देऊन उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.

या आंदोलनाचे नेतृत्व कृति समितीचे एम. ए. पाटील, आनंदी अवघडे, सुमन पुजारी, भगवान देशमुख, श्रीमंत घोडके, सुवर्णा कांबळे, राजू देसले, रंजना गारोळे, स्वाती धायगुडे यांनी केले. या आंदोलनात हजारो आशा व गटप्रवर्तक सहभागी झाले होते.

LIC Life Insurance Corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय