रिक्षा चालक, कष्टकऱ्यांना न्याय देणे हे माझे कर्तव्य : बाबा कांबळे
पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर : विविध आंदोलने, निवेदने देऊन रिक्षा,टॅक्सी चालकांच्या कल्याणकारी मंडळासाठी पाठपुरावा करत यश मिळवून दिले. याबद्दल ऑटो, टॅक्सी, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे व महाराष्ट्र रिक्षा पंचायत राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक बाबा कांबळे यांचा पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील चालक मालकांनी सन्मान केला.
पिंपरी येथील बाबा कांबळे यांच्या कार्यालयात भेट घेऊन हा सन्मान करण्यात येत आहे.या सन्मानाला उत्तर देताना बाबा कांबळे म्हणाले की,
—-सर्वसामान्य कष्टकरी,रिक्षा चालकांच्या न्याय हक्कासाठी आयुष्य समर्पित केले आहे. त्यामुळे कल्याणकारी मंडळासाठी झालेला निर्णय हे माझ्या लढ्याचे यश असले तरी त्यासाठी पाठपुरावा करणे हे माझे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी व्यक्त केले.
या वेळी लोणावळा येथील वरिष्ठ नेते बाबु शेख लोणावळा शहराध्यक्ष आनंद सदावर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटी घेऊन निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता.राज्य सरकारने कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी पाऊले उचलली आहेत.त्याचा पहिला भाग म्हणून मंडळ स्थापन करण्यासाठी तब्बल ५० कोटी रुपये निधी देखील मंजूर केला आहे.
PCMC : रिक्षा, टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ : बाबा कांबळे यांचा सत्कार
संबंधित लेख