Ambegaon : निगडाळे (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. (Ambegaon) जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी उखाणे, बडबडगीत गायन व मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. International Women’s Day at Nigdale Zilla Parishad Primary School
सुरुवातीला शालेय विद्यार्थी व महिलांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण’, आदी सामाजिक संदेश फलकासह गावातून प्रभातफेरी काढली. यानंतर शाळेत राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, इंदिरा गांधी व कल्पना चावला यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे या होत्या. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी लोहकरे, मुख्याध्यापिका शोभा जाधव, अंगणवाडी मदतनीस लिलाबाई लोहकरे, महिला बचत गटाच्या मंदा कुऱ्हाडे, वेणुबाई तिटकारे, अंजना पवार, निलम गायकवाड, शिक्षक संतोष थोरात, उमेश लोहकरे, संतोष लोहकरे, विद्यार्थी व महिला पालक उपस्थित होते.
यावेळी शाळेत महिलांसाठी उखाणे व बडबडगीत गायन, फुगे फुगवणे, मेणबत्त्या पेटवणे, कप्पावर कप ठेवणे, आईस्क्रीम काड्यापासून फुल बनवणे, संगीतखुर्ची आदी मनोरंजक स्पर्धां संपन्न झाल्या. यावेळी नंदाबाई लोहकरे, मंदाबाई कुऱ्हाडे, लीलाबाई लोहकरे, शोभा जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक संतोष थोरात व आभार मुख्याध्यापिका शोभा जाधव यांनी मानले. खाऊवाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
हे ही वाचा :
मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक
पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त
ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा
ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार भाजपात जाणार का? रोहित पवारांची पोस्ट चर्चेत
ब्रेकिंग : रोहित पवार यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; शरद पवार गटाला झटका