Friday, November 22, 2024
Homeकृषीमहाराष्ट्रातही टोळधाडीचे संकट; कृषी विभाग करणार हे उपाय - कृषीमंत्री

महाराष्ट्रातही टोळधाडीचे संकट; कृषी विभाग करणार हे उपाय – कृषीमंत्री

मुंबई(प्रतिनिधी):- देश कोरोनाशी लढत असताना टोळधाडीचे संकट येऊ घातले आहे. आफ्रिका खंडातील टोळधाड आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे. आफ्रिका आणि अरेबियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात- म्हणजे येमेन, सौदी अरेबिया व ओमान आदी ठिकाणी टोळधाडीने लाखो हेक्टर पिकांचे नुकसान केले आहे. भारताला ही या टोळधाडीचा फटका बसणार आहे. त्यामुळे शासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोट्यात चालेला शेती व्यवसाय कसा तग धरत असताना येऊ घातलेले संकट शेतकऱ्यांसाठी आणि सरकारसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. 

       महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि येऊ घातलेले टोळधाडीच्या संकटाचा सामना करण्यास सज्ज असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. टोळधाडीचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मोफत औषधे दिली जातील. तसेच ड्रोनद्वारे औषध फवारणी केली जाईल. ट्रॅक्टरच्या माध्यमातून औधष फावरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सांगितले जाईल. 

       मात्र मुंबईसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात टोळधाडीचे संकट आलेले असताना शेतकरी आपल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. परंतु ते अपुरे ठरत आहेत. टोळधाडीचे संकट हे हवामान बदलाचा परिणाम असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. आता शेतकरी राजाला दिलासा देण्याच्या दृष्टीने उपाय केले जात आहेत, हे आशादायक चित्र आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय