Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : Tata motors चे दोन कंपन्यात विभाजन होणार

मोठी बातमी : Tata motors चे दोन कंपन्यात विभाजन होणार

टाटा मोटर्समधील प्रवासी वाहन व्यवसाय(PV) आणि व्यावसायिक वाहन (CV) स्वतंत्र कंपन्या निर्माण होतील.

नवी दिल्ली : टाटा समूहातील दिग्गज आणि सर्वाधिक चर्चेतील कंपनी असलेल्या टाटा मोटर्सशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. टाटा मोटर्स या महाकाय कंपनीचं दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजन होणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं (TML Board) आज या संदर्भातील प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
त्यामुळे टाटा मोटर्समधील प्रवासी वाहन व्यवसाय(PV) आणि व्यावसायिक वाहन (CV) घटक हे स्वतंत्र असतील. विशेष बाब म्हणजे टाटा मोटर्सचे सर्व भागधारकांना या दोन्ही सूचिबद्ध कंपन्यांमध्ये समान भागीदारी मिळणार आहे. विभागणीनंतर एक युनिट व्यावसायिक वाहनांचा व्यवसाय आणि संबंधित गुंतवणुकीवर लक्ष ठेवेल. दुसरी कंपनी इलेक्ट्रिक वाहने, जग्वार आणि लँड रोव्हर आणि संबंधित गुंतवणुकीसह प्रवासी वाहनांचा व्यवसाय हाताळणे सोपे होणार आहे. असे टाटा समूहाने म्हटले आहे.
टाटा मोटर्सने अलिकडेच मारुती सुझुकीला मागे टाकले असून मार्केट मधील सर्वात मोठी भारतीय कंपनी बनली आहे.आता या कंपनीचे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टाटा मोटर्सच्या विभागणीनंतर एका युनिटमध्ये व्यावसायिक वाहन व्यवसाय आणि संबंधित गुंतवणूक असेल, तर दुसऱ्या युनिटमध्ये पॅसेंजर कार,इलेक्ट्रिक वाहन, जग्वार आणि लँड रोव्हरसह प्रवासी वाहन व्यवसाय आणि संबंधित निर्मिती व गुंतवणूक असणार आहे.

टाटा मोटर्स या एका कंपनीत सध्या सर्व प्रकारच्या वाहनांची निर्मिती होते.आता व्यावसायिक वाहन (Commercial Vehicle) व प्रवासी वाहन (Passenger Vehicle) निर्मितीसाठी दोन स्वतंत्र कंपन्या निर्माण करण्यात येणार आहेत.

प्रक्रियेला 12 ते 15 महिन्याचा कालावधी लागणार

ही डीमर्जची प्रक्रिया NCLT स्किम ऑफ अरेंजमेंट्सद्वारे केली जाईल. मुख्य म्हणजे टीएमएल अर्थात टाटा मोटर्स लिमिटेडच्या सर्व भागधारकांकडे दोन्ही स्वतंत्रपणे सूचीबद्ध केलेल्या कंपन्यांचे समान भाग असतील.ते याचे सारखेच भागधारक राहतील.मागील वर्षी कंपनीच्या व्यवसायिक धोरणांमध्ये चांगली कामगिरी संबंधित व्यावसायिकांनी केली आहे,या कंपनीचे Q3 चे निकालही चांगले आले होते.कंपनीच्या महसूलात वाढ झाली. हा आकाडा 6,952 कोटी रूपये इतका होता. कंपनीचे EBITDA मार्जिन हे 10.9 टक्क्यांवरून 13.9 टक्क्यांवर आले.

डीमर्जरनंतर एक कंपनी कमर्शियल व्हेइकल व त्याच्याशी संबंधित गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करेल. तर दुसरी कंपनी इलेक्ट्रिक व्हेइकल्स, जॅग्वार, लँड रोव्हर व त्याच्याशी संबंधित व्यवसाय पाहील. या संपूर्ण प्रक्रियेला 12 ते 15 महिन्याचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती कंपनीनं 4 मार्च रोजी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

टाटा मोटर्सचे CV, PV आणि JLR व्यवसाय 2021 पासून त्यांच्या संबंधित CEOच्या अंतर्गत स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. टाटा मोटर्सला आशा आहे की, या निर्णयामुळे कर्मचारी, ग्राहक आणि व्यावसायिक भागीदारांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले की, टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत वाढ केली आहे. तीन ऑटोमोटिव्ह व्यवसाय युनिट्स स्वतंत्रपणे कार्यरत असून, सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.

टाटा मोटर्सने म्हटले आहे की, विभागणीमुळे त्यांचे कर्मचारी, ग्राहक आणि व्यावसायिक भागीदारांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी विभाजन बाबत बोलताना म्हटले आहे की, याद्वारे कंपन्या बाजारात सध्या असलेल्या संधींचा अधिक चांगला फायदा घेऊ शकतील.दरम्यान, टाटा मोटर्ससाठी डिसेंबर तिमाही चांगली राहिली. या काळात कंपनीचा नफा 133 टक्क्यांनी वाढून 7100कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा महसूल 25 टक्क्यांनी वाढून 1.11 लाख कोटी रुपये झाला आहे.

NCLT सेटलमेंट योजनेद्वारे डिमर्जरची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. NCLT योजनेला टाटा मोटर्स बोर्ड, भागधारक, कर्जदार आणि नियामकांकडून मंजुरी आवश्यक आहे आणि हे सर्व येत्या वर्षभरात पूर्ण केले जाऊ शकते.

CV आणि PV व्यवसाय यांच्यात मर्यादित समन्वय

टाटा मोटर्सचे सीव्ही, पीव्ही आणि जेएलआर व्यवसाय 2021 पासून त्यांच्या संबंधित सीईओच्या अंतर्गत स्वतंत्रपणे कार्यरत आहेत,या निर्णयामागील तर्क स्पष्ट करताना, कंपनीने म्हटले की जरी सीव्ही आणि पीव्ही व्यवसायांमध्ये मर्यादित समन्वय आहे, तरीही जे आहे ते पुरेसे आहे.
कंपनीला वाटते की ईव्ही,स्वायत्त वाहने आणि वाहन सॉफ्टवेअरच्या क्षेत्रांमध्येती सिनर्जीचा वापर करू शकते. टाटा मोटर्सला अपेक्षा आहे की विलीनीकरणामुळे आमचे कर्मचारी, ग्राहक आणि आमच्या व्यावसायिक भागीदारांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
टाटा मोटर्स ही वाहन क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्येही तिचा सर्वाधिक मोठा वाटा आहे.

टाटा मोटर्सची वाढ चांगली

टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले की, टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत वाढीव वाढ केली आहे. तीन ऑटोमोटिव्ह व्यवसाय युनिट्स आता स्वतंत्रपणे कार्यरत आहेत आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. हे पृथक्करण त्यांना त्यांचे फोकस वाढवून बाजाराद्वारे ऑफर केलेल्या संधींचे अधिक चांगले भांडवल करण्यात मदत करेल.असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय