प्रतिनिधी :- केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या बदलानुसार धान्य, डाळी, तेलबिया, खाद्यतेल, कांदा आणि बटाटा या वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकण्यात आल्या आहेत. त्या विरोधात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन केले.
कोरोनासारख्या आणीबाणीच्या काळात व्यापाऱ्यांना साठेबाजी आणि काळाबाजार करायला मोकळीक देणारा कोणाशीही सल्लामसलत न करता केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाला जनवादी महिला संघटनेने विरोध केला आहे.
या विरोधात मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यात महिलांनी आंदोलन केले.