Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याPCMC: शहरातील सर्व शासकीय व खाजगी शाळेत शासकीय महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यास अनिवार्य...

PCMC: शहरातील सर्व शासकीय व खाजगी शाळेत शासकीय महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यास अनिवार्य करा.

रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांची मागणी

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर: शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय व खाजगी शाळा आहेत या शाळांमध्ये आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. पण केवळ पुस्तकी शिक्षण घेणे म्हणजे ज्ञान नव्हे तर आज आपण या देशात कोणामुळे आहोत,आपल्याला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार कोणामुळे मिळाला ? आपण पारतंत्र्यातून स्वतंत्र देशात कोणामुळे आलो ? आपल्याला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला ? आपला देश घडवण्यासाठी कोणी कोणी आपले आयुष्य समर्पित केले या सर्व गोष्टीची जाण विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे.

तंत्रज्ञानाचे युग असताना सुद्धा खुप मोठी शोकांतिका आहे कि, आजच्या विद्यार्थ्यांना व तरुणांना काही ठराविक महापुरुष सोडले तर इतर महापुरुष कोण आहेत ? त्यांचे नाव काय ? त्यांचे कार्य काय याबाबत आजिबात माहिती नसते अश्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनपासून आपल्या आदर्श महापुरुषांची ओळख होणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्यातील व सामाजिक चालवळीतील त्यांचे मौलिक योगदान समजून येईल.

शहरात मोठ्या प्रमाणात शाळा आहेत परंतु काही ठराविक शाळा सोडल्या तर अनेक शाळा महापुरुषांच्या प्रतिमा लावत नाहीत महापुरुषांच्या जयंती साजरी करत नाहीत त्यामुळे विद्यार्थी देखील यापासून अनभिज्ञ राहतात तरी आपणास विनंती आहे कि आपण शहरातील सर्व खाजगी शासकीय शाळांना परिपत्रक काढून सर्व शासकीय महापुरुषांच्या प्रतिमा शाळेत लावण्यास आदेशित करावे.

सदर विषयाचे निवेदन रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त 1 (शिक्षण विभाग ) यांना निवेदन देण्यात आले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय