Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याPCMC:दिव्यांग लाभार्थी हयातीच्या दाखल्याबाबतच्या सर्वेक्षणास मुदतवाढ

PCMC:दिव्यांग लाभार्थी हयातीच्या दाखल्याबाबतच्या सर्वेक्षणास मुदतवाढ

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर:दि.२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातंर्गत येणाऱ्या दिव्यांग कक्षाच्या वतीने विविध दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांतर्गत दि.२६ डिसेंबर २०२३ पासून ६० दिवसापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या हयातीचा दाखल्याबाबत घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाची मुदत २६ फेब्रुवारी २०२४ रोजी संपलेली असून २७ फेब्रुवारी २०२४ पासून २६ मार्च २०२४ पर्यंत या सर्वेक्षणाला मुदत वाढ देण्यात आली आहे.

          ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर बदलेला असेल अशा लाभार्थ्यांनी तात्काळ योग्य त्या पुराव्यासह लेखी अर्ज मुख्य कार्यालयात सादर करावा. तसेच दिव्यांग नागरिकांनी हयातीच्या दाखल्याबाबत होणाऱ्या सर्वेक्षणाला महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय