गेवराई (प्रतिनिधी):- अमोल कापसे तालुक्यातील भोजगाव येथील अभिषेक राजेद्र संत वय (१७) वर्ष विद्यार्थ्यांने आपल्या आईवडिलाकडे आपल्या पुढील शिक्षणासाठी टॅब मोबाईल घेऊन न दिल्यामुळे गळफास घेऊन जीवन संपवले.
घरच्याकडे मोबाईल घेण्याची मागणी केली असता, लगेच न घेऊन दिल्याने त्याने १८ जून गुरूवार राहत्या घरी घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने ऑनलाईन शिक्षणाचा जिल्हयात पहिला बळी घेतला आहे.
या विषयी माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील अभिषेक राजेंद्र संत याने १० ची परीक्षा दिली होती निकाल अजून बाकी होता. निकाल लागण्यासाठी काही कालावधी बाकी असताना इथून पुढचे शिक्षण आता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने आता आपल्याकडे टॅब नसल्याने त्याची मागणी घरच्याकडे केली असता घरातून थोडे दिवस थांंब घेऊयात. परंतु त्यांनी आपले जीवनच संपवले.
सर्वजण शेतात पेरणी चालू असल्यामुळे सर्व शेतात गेले असताना राहत्या घरात त्याने आत्महत्या केली.ठाणे अमंलदार बांगर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला, व मृतदेह उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे पाठविण्यात आले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शवेच्छदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणापध्दतीच्या चर्चेला उधाण आले असताना एकचा बळी घेतला आहे. शासनाने विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत विधायक माहिती पोहोचविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.