Friday, November 22, 2024
Homeजिल्हाकाका पाणी प्या.! चिमुकलीने विनवणी करताच जरांगे पाटलांनी..

काका पाणी प्या.! चिमुकलीने विनवणी करताच जरांगे पाटलांनी..

एकीकडे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना, दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. मागील पाच दिवसांत त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे. दोन दिवसांपासून जरांगे यांचे हात थरथरतायात, बोलण्यास देखील त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे. त्यांनी सलाईनही लावण्यास नकार दिला आहे.

मनोज जरांगे यांना सर्वजण पाणी तरी प्या असा आग्रह करत आहेत. एका चिमुकलीनेही जरांगे काका पाणी प्या, अशी विनवणी केली आहे. पण जरांगे कुणाचेही ऐकेनात. कुणालाही प्रतिसाद देत नाहीत. आधी अध्यादेशाची अंमलबजावणी करा, मगच पाणी घेतो असं त्यांनी म्हटलंय. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत पाण्याच्या थेंबालाही हात लावणार नाही असं जरांगे यांनी सांगितलं. त्यामुळे सर्वांनाच काळजी वाटू लागली आहे. काल जरांगे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सलाईन लावण्यात आली होती. झोपेतच त्यांना सलाईन लावली होती. पण जाग येताच त्यांनी सलाईन काढून टाकली. आजही त्यांना अशक्त वाटत आहे. त्यांचे डोळे उघडत नाहीये. त्यातच पोटदुखीचा त्रासही वाढला आहे.

उपोषण जिवघेणे ठरू शकते – डॉक्टर

मनाेज जरांगे पाटलांच्या प्रकृतीचा विचार करता सलग पाच दिवस अन्नपाणी न घेणे त्यांच्या जिवावर बेतू शकते. यातून त्यांना मेंदूचा पक्षाघात, किडनी, यकृतावर सूज येणे असे प्रकार घडू शकतात, अशी भीती छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. विनोद चावरे यांनी व्यक्त केली. जरांगे पाटलांचे वजन 52 किलोपेक्षाही कमी असल्याने अधिक दिवस पाणी व अन्नाशिवाय राहणे त्यांच्यासाठी धोकादायक असल्याचे डॉ. चावरे म्हणाले.

संबंधित लेख

लोकप्रिय