Saturday, May 18, 2024
Homeबॉलिवूडपॉर्नस्टार जॉनी सिन्सला रणवीर सिंगने दिली कोणती गोळी? हा व्हिडियो पाहा..

पॉर्नस्टार जॉनी सिन्सला रणवीर सिंगने दिली कोणती गोळी? हा व्हिडियो पाहा..

जगप्रसिद्ध पॉर्नस्टार जॉनी सिंस आणि रणवीर सिंग यांनी मिळून एक गमतीदार टिव्ही ऍड सादर केली आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आनंद लुटला आहे. पारंपारिक भारतीय टीव्ही सिरीयल चा प्लॉट घेत अत्यंत हास्यास्पद स्वरूपात भारतामध्ये जॉनी सिंसचे पदार्पण होत आहे. याआधी पॉर्न इंडस्ट्री मध्ये पारंगत असलेली सनी लियोनी बॉलीवूड मध्ये यशाच्या टप्प्यावर पोचली त्यानंतर अमेरिकेतील प्रसिद्ध पॉर्नस्टार जॉनी सिंस हा देखील याच वाटेवर आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. रणवीर हा त्याच्या बोल्ड आणि बिंधास्त स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकतो.रणवीरचं न्यूड फोटोशूट हे चर्चेचा विषय ठरलं होतं. आता रणवीर त्याच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आहे. या जाहिरातीत रणवीर आणि पॉर्नस्टार जॉनी सिन्स (Johnny Sins) हे दोघे एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. रणवीर आणि जॉनी यांची ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावरल्या तर काहींनी रणवीरचं कौतुक केलं.

रणवीर आणि जॉनी सिन्सची जाहिरात


रणवीर आणि जॉनी सिन्स या दोघांनी एका जाहिरातीमध्ये एकत्र काम केलं आहे. या जाहिरातीचा व्हिडीओ रणवीरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका सिरीयलचा सीन दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये रणवीर हा एका प्रोडक्टची माहिती देताना दिसत आहे. हे प्रोडक्ट मेन्स सेक्शुअल हेल्थचे आहे. रणवीर आणि जॉनी सिन्स यांच्या या जाहिरातीवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

तन्मय भट्ट, अर्जुन कपूर, सॉन्ग क्रिएटर यशराज मुखाटे यांसारख्या सेलिब्रिटींनी रणवीर आणि जॉनी यांच्या या जाहिरातीवर कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं या जाहिरातीला कमेंट केली, “भाई, ये क्या देख लिया”, तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, “जॉनी भैय्या फस गए डेली सोप के चक्क मैं”

पाहा व्हिडीओ
:

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय