Friday, November 22, 2024
Homeराजकारणब्रेकिंग : अजित पवार गटाच्या आमदार अपात्रते संदर्भात महत्वाची अपडेट

ब्रेकिंग : अजित पवार गटाच्या आमदार अपात्रते संदर्भात महत्वाची अपडेट

नवी दिल्ली : अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार अपात्रता सुनावणीच्या निकाला संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे.

अजितदादा आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे निर्देश नार्वेकर यांना द्या, अशी मागणी करत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल १५ फेब्रुवारीपर्यंत द्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. नार्वेकरांनी याबाबत वेळ वाढवून मागितली होती, मात्र त्यांची मागणी फेटाळून सुप्रीम कोर्टाने लावली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय