पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाची जेनेसिस १६ ह्या संघाने ने नुकत्याच पार पडलेल्या एम बाहा एस ए इ इंडिया २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रवेग श्रेणी (Acceleration category) मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. एम बाहा ही एस ए इ इंडिया द्वारे आयोजित केल्या जाणारी इंजिनीरिंग क्षेत्रातील प्रतिष्ठेची मानल्या जाणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेत, संपूर्ण भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी खडबडीत भूप्रदेशातील कठोर घटकांना तोंड देऊ शकतील अशा रस्त्यांवरील वाहनांची रचना, तयार केल्या जाते आणि तयार झालेल्या वाहनांची स्पर्धा केल्या जातात .एम बाहा एस ए इ इंडिया २०२४ हि स्पर्धा पिथमपूर, इन्दौर येथे आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण भारतातून एकूण ७२ हुन अधिक संघानी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदविला. जेनेसिस १६ या संघाला डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च चे उप प्राचार्य डॉ. सुनील डंभारे तसेच प्राध्यापक सुशील गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्य साठी महाविद्यालयातील प्राचार्य, उप प्राचार्य प्राध्यापक, कर्मचारी सतत कार्यरत असतात. या महाविद्यलयाला NAAC मानांकन असून आय. एस ओ 21001:2018 प्रमाणित आहे .
विद्यर्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या प्राचार्य डॉ सौ अनुपमा पाटील, कुलसचिव श्री वाय के पाटील, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. गणेश जाधव, डॉ डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रिअर ऍडमिरल अमित विक्रम, डी. वाय. प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री. तेजस एस. पाटील , संस्थेचे चेअरमन श्री. सतेज डी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशा बद्दल विद्यार्थ्यांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे