देश विदेश
१) अलास्काच्या समुद्रात ७.८ रिस्टरस्केलचा भूकंप
ॲकॅरेज, अमेरिका: अलास्कामध्ये भुकंप झाला असून त्याचे केंद्र समुद्रात असल्यामुळे सुनामीची सुचना प्रसारित करण्यात आली आहे.
२) अमेरिकेने आम्हाला होस्टनचे द्विपक्षिय कार्यालय बंद करायाला सांगितले: चीन
बीजिंग, चीन: होस्टनमधील चीनचे पासपोर्ट कार्यालय चीनने बंद केल्यावर त्यांचे कारण चीनने स्पष्ट केले. चीनने ही वूहान मधील पासपोर्ट कार्यालय बंद करण्याच्या विचार असल्याचे सांगितले.
३) मुक्त हिंद पॅसिफिक करण्यासाठी अमेरिका आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्यांचे बेस तयार चांगल्या सुविधांसहीत तयार करावे लागतील: अमेरिकेचे सुरक्षा तज्ञ
वॉशिग्टन, अमेरिका: अमेरिकेचा प्रभाव आशिया देशांवर ठेवण्यासाठी आणि चीनचा आशियामध्ये वाढलेला प्रभाव पाहता अमेरिकेच्या सुरक्षा विशेषज्ञांनी अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांनी त्यांचे हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागरातील बेस अत्याधूनिक शस्त्रांच्या उत्पादनाच्या कारखाण्यांसहित सज्ज ठेवले पाहिजेत असे सांगितले.
४) भारतीय मूलत्वाच्या परिचारिकेला सिंगापूरमध्ये राष्ट्राध्यक्ष पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे
सिंगापूर: भारतीय मूलत्वाच्या परिचारिकेला तिने कोरोना रोखण्यासाठी दिलेल्या योगदान बद्दल हा सन्मान देण्यात येणार आहे असे सांगितले. कला नारायण असे त्या परिचारिकेचे नाव आहे.
५) अमेरिकेने चीनवर राष्ट्रीय माहिती चोरणे आणि कोरोनाची माहिती चोरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला
वॉशिग्टन, अमेरिका: चीनने देशाची सुरक्षाविषयक माहिती, कोरोना संशोधनाविषयीची माहिती चोरल्याचा दावा अमेरिकने केला. चीन आता रशिया, इराण आणि उत्तर कोरिया सारखा वागत असल्याचे त्यांनी सांगितले.
६) आशियाई बॅकेंने पाकिस्तानला १७५० कोटी रूपयांचे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कर्ज दिले
बीजिंग, चीन: आशियाई बॅकेंने पाकिस्तानला कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम पाहता १७५० कोटी रूपयांचे कर्ज पाकिस्तानला मंजूर केले. त्यामध्ये आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर द्यायला बॅकेंने सांगितले.
७) न्युझीलंडच्या पंतप्रधानांनी मंत्र्याला त्याच्या कार्यालयातील कर्मचारी बरोबर गरज नसलेले संबंधाच्या कारणामूळे पदावरून काढून टाकले
वेलिंग्टन, न्युझीलंड: मंत्राचे कार्यालयातील कर्मचारी बरोबर विशिष्ट प्रकाराचे संबंध असल्यामुळे त्याला न्युझीलंडमध्ये पदावरुन पायऊतार करण्यात आले.
८) भारत आणि अमेरिका वैमानिक विरहीत लढाऊ विमानांवर एकत्र काम करण्यासाठी चर्चा करत आहे: पेन्टागॉन
वॉशिग्टन, अमेरिका: भारत अमेरिका विना वैमानिकांच्या लढाऊ विमानांवर एकत्र काम करण्यासाठी चर्चा करत आहेत. यामध्ये भारताचे हवाईदल आणि डिआरडिओ काम करत आहे.
९) जपानने डेस्कामेथासोनला कोरोनावर उपचारासाठी वापरायला मान्यता दिली
टोकियो, जपान: जपानने ब्रिटनने मृत्यू प्रमाण डेस्कामेथासोनमुळे कमी होते सिद्ध केल्यावर वापरासाठी परवानगी दिली.
१०) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पनने सर्वांना मास्क घालण्याचे आवाहन केले
वॉशिग्टन, अमेरिका: कोरोना प्रार्दुभाव वाढल्यामूळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पने मास्क घालण्याचे आव्हान केले. याआधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प मास्क घालण्याच्या विरोधात होते.