(उस्मानाबाद) :- हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्याचे थोर सेनानी भाई नरसिंगराव देशमुख यांच्या जयंतीचे अवचित्य साधून 25 जुलै रोजी उस्मानाबाद येथील सोलापूर – येडशी बायपास रोड सांजा चौक तथा भवानी चौकातील उड्डाण पुलाचे लोकनेते भाई नरसिंगराव देशमुख काटीकर असे नामकरण करण्यात आले.
पुलाचे उदघाटन जेष्ठ शिक्षणतज्ञ एम. डी. देशमुख, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, गटनेते युवराज बप्पा नळे आदींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी युवराज बप्पा नळे यांनी मनोगत व्यक्त केले तर भाई अमरसिंह देशमुख यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी ऍड भाई अविनाशराव देशमुख, ऍड जयंत जगदाळे, श्रीराम बापू सूर्यवंशी, संभाजी सूर्यवंशी, सुमंत माने, दत्ता बापू सूर्यवंशी, संग्राम मुंडे, डॉ सचिन देशमुख विश्वजित देशमुख, बलराज रणदिवे, ऍड भाई कैलास बागल, ऍड. राघवेंद्र बोधले, ऍड भाई पवन भोसले, संजय देशमुख, कॉ भाई सुजित चंदनशिवे, भाई योगेश मोरे, भाई भूषण गंगावणे, भाई सूर्याजी खुणे, कॉ आकाश मिसळे आदी मान्यवर उपस्थित होते.