Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडव्हिडिओ : कामगार दिनी फेरीवाल्यानीं केला उपवास

व्हिडिओ : कामगार दिनी फेरीवाल्यानीं केला उपवास

पुरस्कारासाठी आयुक्तांकडून गरीब फेरीवाल्यांवर कारवाई – काशिनाथ नखाते

पिंपरी चिंचवड : फोल ठरलेली स्मार्ट सिटी,स्वच्छ भारत अभियान व नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करुन अर्बनस्ट्रीटच्या नावाखाली पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच प्रभागांमध्ये फेरीवाल्यांवर  मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून ही कारवाई अन्यायकारक असून एकेकाळी पाव विकणारे भाजीपाला विकणारे आयुक्त यांचेकडून फेरीवाल्या बद्दल जाणिव  व सद्भावनापूर्वक कामाऐवजी मोठेपद आल्यावर अन्याय करुन गरिबांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे. असा आरोप कामगार नेते काशिनाथ नखाते (kashinath nakhate) यांनी केला आहे.

तुम्हाला आवड असलेल्या पुरस्कारासाठी आमच्या गोरगरिबांचा रोजगार हिरावून घेऊ नका अन्यथा महापालिकेच्या दारात येऊन बसु असा इशारा आज नैशनल हॉकर फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे सर्व फेरीवाल्यांकडून देण्यात आला. 

रिकामटेकड्याना प्रसिद्धी देऊ नये – अजित पवार

भक्तीशक्ती निगडी येथील फेरीवाल्यानी आज मनपाच्या कारवाई  निषेधार्थ उपवास केला. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, बिलाल तांबोळी, समाधान जावळे, अशोक ढगे, राहुल कुलकर्णी, बबलू सिंग, शोभा दोरवे, मुन्ना मनियार, मलिका राजनाळ, रफिक शेख, सुलाबाई पगारे, रिना गायकवाड, नसरीन सेख, रेखा दुधभाते, संध्या कांबळे, संगीता वाघमारे, विजय लोखंडे, अशोक ढगे, आयर्वीन फर्नांडिस, बाळकृष्ण पवार, संतोष ढेरंगे अनिल आदलिंगे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी नखाते म्हणाले की मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, राजीव जाधव, दिनेश वाघमारे यांनी फेरीवाल्यांच्या बाबतीत समाधानकारक काम केले. मात्र आयुक्तपदी राजेश पाटील यांची नेमणूक झाल्यापासून पथारी, हातगाडी, स्टॉल धारक  गोरगरीबावर अन्यायकारक व बेकायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Pune Bharti 2020 : आयटीआय मध्ये 40 जागांसाठी होणार भरती, जाणून घ्या !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने काढलेल्या कारवाईचा बेकायदेशीर कारवाईच्या आदेशाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेले असून माननीय न्यायालयाने परवाना धारकावर कारवाईस स्थगिती दिली आहे. कायदशीर प्रक्रिया न करता मनपाकडून बेकायदेशीर हॉकर झोन,बोगस सर्व्हे करून फेरीवाल्यांना त्या जागेवरून दमदाटी करून हटवले जात आहे. केली जात आहे. हे चुकीचे असून पथ विक्रेता कायद्याच्या कलम ३ व ४ या कलमाचे उल्लंघन आयुक्तांकडून होत आहे. अशा प्रकारची जबरदस्ती आणि शहर फेरीवाला समिती व संघटनाला विश्वासात न घेता चुकीच्या जागा निवडल्याने मनपाच्या अनेक मंडया ओस पडल्या आहेत.  

मनपाला यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र हे आयुक्त पुरस्कारासाठी नेहमी अग्रेसर असतात मात्र  पुरस्कार हा कोनाचा बळी जात असेल तर योग्य नाही. आता ही तिच स्थिती आहे. फेरीवाल्यानीं नाकारलेल्या जागांचा हट्ट केला जात आहे हे थांबवुन शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेने कामकाज करावे अन्याथ संघर्ष करायला फेरीवाले तयार आहेत.

– क्रांतिकुमार कडुलकर

10 वी / ITI उत्तीर्णांना संधी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांची मोठी भरती

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय