Monday, May 6, 2024
Homeजिल्हारिकामटेकड्याना प्रसिद्धी देऊ नये - अजित पवार

रिकामटेकड्याना प्रसिद्धी देऊ नये – अजित पवार

पुणे : महाराष्ट्राच्या पत्रकारितेला गौरवशाली परंपरा आहे. स्वातंत्र्य चळवळीत राजकीय व सामाजिक भान निर्माण करण्याचे काम पत्रकारांनी केले. सामाजिक परिवर्तनासाठी आणि लोकजागृतीचे महत्वाचे साधन म्हणून पत्रकारिता काळानुरुप वेगाने बदलत आहे. वृत्तपत्राची कागदावरील आवृत्ती ते संगणक, खिळे जुळविण्यापासून ते डिजिटल समाज माध्यम असा माध्यमांचा प्रवास झालेला आहे. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा जपण्याची आपणा सर्वांची जबाबदारी असून माध्यमांनी राज्याचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारीने काम करावे (Maharashtra’s unity is uninterrupted Thevanyasathi Madhyamani should get the work done) , असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy chief minister Ajit Pawar) यांनी केले. 

एस. एम. जोशी फाऊंडेशन, पुणे (Pune) सभागृहात पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार कै.वरुणराज भिडे स्मृति पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

Pune Bharti 2020 : आयटीआय मध्ये 40 जागांसाठी होणार भरती, जाणून घ्या !

कृषी महाविद्यालय, पाथरी येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 मे शेवटची तारीख

यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, वेगवान माहिती प्रसारित करणारी समाज माध्यमे दुधारी शस्त्रासारखी आहेत. यातील माहितीची खात्री करण्यासाठी सक्षम यंत्रणा सध्या नाही. त्यामुळे गैरसमज वाढत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला पडले असून राजकीय पक्ष केवळ आरोप-प्रत्यारोपांमध्येच व्यग्र आहेत आणि ती भांडणं दाखविण्यात माध्यमं गुंतून पडली आहेत. रिकामटेकड्याना माध्यमांनी प्रसिद्धी देऊन नये. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

यावेळी लोकसत्ता’चे राजकीय संपादक संतोष प्रधान यांना वरुणराज भिडे पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, `सामना’च्या मेधा पुंडे-पालकर, ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अलका धूपकर, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे जुन्नर येथील प्रतिनिधी धर्मेंद्र कोरे आणि ‘एबीपी माझा’चे उस्मानाबाद येथील प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Pune Nokari : साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स, पुणे मध्ये विविध पदांसाठी भरती

10 वी / ITI उत्तीर्णांना संधी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांची मोठी भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय