बार्शी : आयटक संलग्न बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना बांधकाम कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन पंतप्रधान, कामगार मंत्री, कामगार आयुक्त, सचिव, मुख्यकार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य इमारत कल्याणकारी मंडळ यांना पाठवण्यात आले आहे.
निवेदनात म्हणाले, बांधकाम कामगारांची आॅनलाईन नोंदणी तातडीने थांबवा, 15 फेबुवारी 2020 रोजी बांधकाम कामगारांना पाच हजार देण्याचे शासनाने मान्य केले ते ताताडीने द्यावेत, ज्या कामगारांना 2 हजार रूपये मिळाले नाहीत त्यांना तातडीने ते जमा करा, घर बांधणीसाठी 2 लाख रूपये अनुदान द्या, बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रूपये द्या, बांधकाम कामगारांना आत्यावश्यक वस्तू तातडीने देणे सुरू करा, बांधकाम कामगारांना इएसआय चालू करा या मागण्या निवेदन देण्यात आले.
त्यावेळी काॅ. तानाजी ठोंबरे, काॅ. ए. बी. कुलकर्णी, काॅम्रेड अनिरूध्द नखाते, काॅ. शाफीन बागवान, काॅ. बालाजी शितोळे, अंबादास तडकापल्ली, शेखर बिनगुंडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.