मुंबई : गेल्या काही दिवसांपासून घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला काही तरुणांना तिच्या कामाचे 1800 रुपये मागताना दिसत आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडियामध्ये विविध प्रतिक्रिया येत आहेत. या व्हीडिओची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यावर गंभीर प्रतिक्रिया देत म्हंटले आहे की, घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये. pic.twitter.com/IiMejTycs9
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) August 31, 2020
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत असेही त्यांनी आपल्या म्हंटले आहे.