Saturday, May 4, 2024
Homeग्रामीणमाजलगाव येथे 'माकप'चे हाथरस प्रकरणातील पिडितेला न्याय मिळण्यासाठी आंदोलन

माजलगाव येथे ‘माकप’चे हाथरस प्रकरणातील पिडितेला न्याय मिळण्यासाठी आंदोलन

योगी सरकारच्या विरोध तीव्र घोषणाबाजी 

माजलगाव : आज माजलगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी हाथरस बलात्कार व अमानवी हत्या प्रकरणाच्या निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच हे प्रकरण दडपणाऱ्या युपीच्या भाजप सरकार व पोलीस प्रशासनाचा देखील निषेध करण्यात आले.  हे आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड मुसद्दिक बाबा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

अमानवीय दुर्घटनेचा आणि या प्रकरणात यूपी मुख्यमंत्री योगी व त्यांचे पोलीस प्रशासन आरोपींच्या बाजूने आणि पीडिता व पिडतेच्या कुटुंबाच्या विरोधात आहेत. आरोपींना पाठीशी घालण्यासाठी पीडित युवतीचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात न देता परस्पर जाळून टाकणाऱ्या युपी पोलीस प्रशासनाच्या या मानवतेला काळीमा फासणाऱ्या या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आले  हे कृत्य मनुस्मृति आधारित पुरुषसत्ताक मानसिकतेतून केला जात आहे, भाजपच्या उत्तरप्रदेश सरकाराचा व मुख्यमंत्री योगी यांचा निषेध करण्यात आले व पिडीत मुलीला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.   

यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य ऍड. काॅ. सय्यद याकूब, कॉ. शिवाजी कुरे, एसएफआय चे रुपेश चव्हाण, विनायक चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे अंकुश जाधव, आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यांच्यासह मेहबूब शेख, सय्यद रफिक, सय्यद फारुख, राहुल मोताळे, विशाल इंगळे, मेहंदी, चिंतामनी चव्हाण, शेषराव आबुज, विठ्ठल सक्राते, एकनाथ सक्राते, मुस्तकिम बाबा, संदिप फंदे आदी सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय