वडवणी : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद मध्ये आज वडवणी येथे सर्वपक्षीय वडवणी बंद ठेवण्यात आली यावेळी व्यापारी, शेतकरी, व नागरिकांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.
यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने देखील सक्रिय सहभाग नोंदवला व शेतकरी विरोधी तीन काळे कायदे तात्काळ रद्द करा ही मागणी करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तहसीलदार यांना निवेदन देऊन भारत बंद मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला व पाठिंबा दिला.
यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी कॉ. रवी उरूनकर, कॉ. शंकर टिपरे, अंकुश खारगे, गोविंद लोकरे आदी सहभागी होते.