शिवसेना आळंदी शहर प्रमुख पदी राहुल चव्हाण
आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांची शिवसेना आळंदी शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
राहुल चव्हाण यांनी नुकताच मंगळवारी (दि. २७) मुंबई येथे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत बहुसंख्य कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांची शिवसेना आळंदी शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
तीर्थक्षेत्र आळंदीचे विकासास निधी कमी पडू देणार नाही – माजी खासदार आढळराव पाटील
यावेळी माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले, श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पुण्यभूमी आळंदीतील राहुल चव्हाण यांना समाजकार्याची आवड आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. आळंदीकरांनी याआधी शिवसेनेचे अनेक नगरसेवक निवडून दिले आहेत. येत्या निवडणुकीत राहुल चव्हाण या तरुणाच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे. आळंदीच्या विकास कार्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. येथील पिण्याचे पाण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्द्ध करून पिण्याचे पाण्याचे टाक्या (स्टोअरेज) विकसित करून पाणी साठवण क्षमता वाढविण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सुमारे सव्वा सहाशे कोटीवर रक्कमेचा निधीसाठी प्रस्ताव पाठविला असून लवकरच इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होण्याचे काम मार्गी लागेल. तीर्थक्षेत्र आळंदीतील सिद्धबेटचे पुरातन महत्त्व लक्षात घेऊन विकास साधण्यास पाठपुरावा सुरु असून त्यासाठी देखील निधी दिला जाईल असे सांगितले. युवक तरुण राहुल चव्हाण यांचेसह माझेही मागे खंबीर पणे उभे राहून साथ द्यावी. तीर्थक्षेत्र आळंदीचे विकास कामास निधी कमी पडू देणार नाही. असे सांगत शिरूर लोकसभेसाठी माझेही मागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आळंदीचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचेशी संवाद साधून त्यांनी येथील घनकचरा आणि पिण्याचे पाण्यासाठीच्या अडचणी जाणून घेतल्या.
नवनियुक्त आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांनी निवडी नंतर आळंदी मंदिरात जाऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शन घेतले. यावेळी आळंदी देवस्थान तर्फे व्यवस्थापक माउली वीर यांनी तसेच माऊली ग्रुप तर्फे व्यापारी तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गुळुंजकर यांनी राहुल चव्हाण यांचा सत्कार केला.
यावेळी राहुल चव्हाण म्हणाले, आळंदी शहर विकासात सर्वाना बरोबर घेऊन काम केले जाईल. राज्यातून येणाऱ्या वारकरी भाविकांसह आळंदीतील नागरिकांना नागरी सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी प्राधान्याने दिले जाईल. यासह पक्ष संघटना अधिक मजबूत करीत आळंदी नगरपरिषदेत पुन्हा शिवसेनेची सत्ता आणि खेड आळंदी विधान सभेचा आमदार, खासदार शिवसेनेचाच निवडणून आणण्यास पक्षादेशा प्रमाणे कामकाज केले जाईल. लवकरच आळंदीतील विविध प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे माध्यमातून आळंदीत बैठक लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांचे बंधु पर्यावरण विभागाचे संचालक नितीन गोरे, शिवसेना जिल्हा संघटक अशोक भुजबळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, शिवसेना तालुका प्रमुख राजु जवळेकर,खेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजयसिंह शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय बाप्पु पठारे, युवासेना तालुकाप्रमुख विशाल पोतले, महिला आघाडी तालुका प्रमुख ज्योती आरगडे, नगरसेवक महेश शेवकरी, शिवसेना तालुका संघटक महादेव लिंबोरे, सहकार सेनेचे तालुकाप्रमुख मारुती सातकर, चऱ्होली कुरुळी गटाचे शिवसेना उपतालुका प्रमुख संदिप येळवंडे, वाडा-कडूस युवासेना उपतालुका प्रमुख योगेश पगडे, युवासेना उपतालुका प्रमुख संदिप काचोळे, सहकार सेनेचे उपतालुका प्रमुख शंकर घेनंद, शिवसेना विभागप्रमुख राहुल थोरवे, युवासेना विभागप्रमुख निखिल वर्पे, उपविभाग प्रमुख सचिन विरकर, शिवसेना उपविभाग प्रमुख रायबा साबळे, चऱ्होलीचे माजी सरपंच शिवाजीराव पगडे, मनीषा गावडे, सचिन शिंदे, नितीन ननवरे, रामेश्वर पांचाळ, साईनाथ ताम्हाणे, शशिकांत बाबर, वैभव पाटील, गोविंद पाटील, ज्ञानेश्वर घुंडरे, गोविंद तौर, दिनकर तांबे, हिरामण तळेकर, मोहन तळेकर, सरपंच, उपसरपंच आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.