Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणनांदेड येथील 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून निर्घुण हत्या करणाऱ्या नराधामांना तात्काळ...

नांदेड येथील 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून निर्घुण हत्या करणाऱ्या नराधामांना तात्काळ अटक करून फाशी द्या – मयुर गांगोडे

नाशिक : नांदेड येथील 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून निर्घुण हत्या करणाऱ्या नराधामांना तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी कणसरा ग्रुप फाऊंडेशनचे संस्थापक मयुर गांगोडे यांनी ईमेल निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी गावातील आदिवासी मन्नेरवारलू जमातीच्या 5 वर्षाच्या चिमुरडीचा बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. अद्याप मुख्य आरोपी फरार आहे, संशयित एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.

उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पोस्ट मोर्टम साठी बॉडी आणली असता, संबंधित भोकर येथील डॉक्टर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात इन कॅमेरा पोस्ट मोर्टम करण्यासाठी घेऊन जावं अशी विनंती गावकऱ्यांना केली आहे. इतकी भयंकर घटना होऊन सुद्धा, घटनास्थळी एकही वरिष्ठ अधिकारी भेट दिली नाही. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या चिमुकलीच्या बलात्कार प्रकरणाकडे विशेष लक्ष घालून आरोपीला ताबडतोब अटक करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी केली आहे. 


संबंधित लेख

लोकप्रिय