Friday, December 27, 2024
Homeग्रामीणबार्शी : श्रिपतपिंपरी फाट्‍यावर किसान सभेचा झाला रस्ता रोको

बार्शी : श्रिपतपिंपरी फाट्‍यावर किसान सभेचा झाला रस्ता रोको

बार्शी (सोलापूर) : अखिल भारतीय किसान सभा बार्शी तालुका कौन्सिलच्या वतीने तीन काळे कृषी कायदे रद्द करा, त्यासोबतच शेतकर्‍यांवर होत असलेली दडपशाही थांबली पाहिजे यासह अन्य मागण्यांंना घेऊन आज (दि.6 फेब्रु) रोजी कुर्डवाडी रस्त्यावरील श्रीपतपिंपरी फाटा येथे रस्ता रोको करण्यात आला. हा रस्ता रोको काॅ. तानाजी ठोंबरे व काॅ. लक्ष्मण घाडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.

यावेळी कॉ. तानाजी ठोंबरे म्हणाले, “लोकशाही मार्गाने शेतकऱ्यांचा लढा पुढे जाईल व मोदीचे भाजप आणि आरएसएसला वठणीवर आणूनच तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यास भाग पाडेल.” यावेळी कॉ. लक्ष्मण घाडगे यांचेही भाषणे झाले. यावेळी पोलीस अधिकारी सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात पैगंबर मुलाणी, बाळासाहेब जगदाळे, बाळराजे पाटील, शाहूराज घाडगे, धनाजी पिंगळे, सुभाष पिंगळे, तानाजी काकडे, पोपट घाडगे, अनिल कोळी, शिवाजी घाडगे, शिवाजी काकडे, प्रकाश ताकभाते, सूटाचे प्रा. रानो कदम, प्रा. डाॅ. राजन गोरे, लता यादव, आयटक संलग्न डाॅ. जगदाळे मामा हाॅस्पीटल श्रमिक संघाचे लहू आगलावे, भारत पवार, धनाजी पवार, किसान मूळे, प्रविण मस्तुद, अनिल शिंदे, अनिल सावंत, आनंद गुरव, कादर पठाण, विजय खुणे, ग्रामपंचायत संघटनेचे ए.बी. कुलकर्णी, बाळासाहेब चांदणे, सतिश गायकवाड, सुरेश कुंभार, मुबारक मुलाणी, संजय ओहळ, आतूल पर्बत, काॅ. अनिरूध्द नखाते, शौकत शेख, बालाजी शितोळे, भारत चव्हाण, सोमनाथ चव्हाण, नवाज मुलांनी, आमले, जगदाळे आॅल इंडिया स्टुडंन्टस फेडरेशनचे पवन आहिरे, सुयश शितोळे हे उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय