घोडेगाव : घोडेगाव ता.आंबेगाव जि.पुणे येथे अखिल भारतीय किसान सभा(AIKS) व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) यांनी केंद्रसरकारच्या शेतकरी विरोधी धोरण व कृतीचा निषेध करत नायब तहसीलदार यांना निवेदन सादर करत दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा दिला आहे.
सुमारे ७० दिवसांपेक्षा अधिक दिवस सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून व शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आंबेगाव तालुक्यातील अखिल भारतीय किसान सभा व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या शेतकरी व विद्यार्थी संघटनेने एकत्र येऊन घोडेगाव येथे नायब तहसिलदार ए.बी.गवारी यांना निवेदन सादर केले.
यावेळी किसान सभेचे तालुका सचिव अशोक पेकारी,अशोक जोशी,दत्ता गिरंगे एस.एफ.आय. या विद्यार्थी संघटनेचे पुणे जिल्हा सचिव अविनाश गवारी, आंबेगाव तालुका सचिव समीर गारे,महेश गाडेकर इ.उपस्थित होते.