Friday, December 27, 2024
Homeग्रामीणधारूर : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) ची राज्यस्तरीय रोजगार अधिकार...

धारूर : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) ची राज्यस्तरीय रोजगार अधिकार कार्यशाळा संपन्न

तेलगाव : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्या वतीने राज्यस्तरीय रोजगार अधिकार कार्यशाळा मानवी हक्क अभियान कार्यालय नेल्सन मंडेला वसाहत तेलगाव येथे नुकतीच पार पडली.

 

महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) राज्य कमिटीच्या वतीने तेलगाव ता. धारूर जि. बीड या ठिकाणी दोन दिवसीय रोजगार अधिकार कार्यशाळचे आयोजन करण्यात आले, यावेळी ध्वजारोहन करून कर्मवीर एकनाथराव जिजा आवाड यांना अभिवादन करण्यात आले. 

या कार्यशाळेच्या पहिल्या सत्राच्या उद्घाटनात रोजगाराचा हक्क मुलभुत हक्क करा, भूमिहीन शेतमजूरांना वर्षातुन 200 दिवस काम द्या, रोजगार हमी कामावर 600/- या मागण्यासाठी मजुर वर्गाने संघटीत होऊन संघर्ष करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. या कार्यशाळेसाठी राज्यभरातील शेतमजूर प्रतिनिधी सहभागी झाले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय