सोलापूर : पेट्रोल – डीझेल व स्वयपाक गॅसच्या दरात झालेली प्रचंड दरवाढ मागे घेण्याची मागणी करत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीस्वंजिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेेेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याचे कारण देत पेट्रोल – डिझेल आणि स्वयपाक गॅसच्या दरात दररोज वाढ करण्यात येत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकास असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे भान वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या महागाईने गरीब कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. स्वंंयपाक गॅसवरील अनुदानाची रक्कम दिवसेंदिवस कमी होत चालली असून अनुदान म्हणून १ रुपयांपेक्षा कमी रक्कम बँक खात्यात जमा झाली आहे. आणि सिलेंडर खरेदीकरिता ८०२ रुपये द्यावे लागत आहे. पेट्रोल – डिझेल मध्ये झालेली दरवाढीमुळे प्रवासी व माल वाहतुकीचे दर वाढल्याने अन्नधान्याच्या किमती दिवसँदिवस वाढून सर्वसामान्य कुटुंबाचे जगणे मुश्कील झाले आहे. गेल्या वर्षीचा लॉकडाऊन , कोरोनाची आलेली दुसरी लाट यामुळे सामान्य नागरिकांच्या हालचालीवर आलेले निर्बध परत एकदा लॉकडाऊन लागण्याची निर्माण झालेली भीती या परिस्थितीत महागाईच्या भडकामुळे जनता त्रस्त झाली आहे.
पेट्रोल – डिझेल व स्वयपाक गॅसच्या दरवाढीमुळे होत असलेल्या महागाईवर नियंत्रण मिळविण्याकरिता पेट्रोल – डिझेल, स्वयपाक गॅस चे दर कमी करुन सर्वसामान्य जनतेस जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रास्त दरात करण्याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या आंंदोलनात जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्षा नसीमा शेख, जिल्हा अध्यक्षा शेवंता देशमुख, जिल्हा सेक्रेटरी शकुंतला पाणीभाते यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.