Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणपिंपरी चिंचवड : गरिबांना हक्काचे घर द्या, अन्यथा हक्काचे घर मिळण्यासाठी तीव्र...

पिंपरी चिंचवड : गरिबांना हक्काचे घर द्या, अन्यथा हक्काचे घर मिळण्यासाठी तीव्र आंदोलन – अपर्णा दराडे

जनवादी महिला संघटना हक्काच्या घरासाठी लढणार !

पिंपरी चिंचवड : गरिबांना हक्काचे घर द्या, अन्यथा हक्काचे घर मिळण्यासाठी तीव्र आंदोलन करावे. लागेल, असा इशारा अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या शहर अध्यक्षा कॉम्रेड अपर्णा दराडे यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब आणि अल्पउत्पन्न गटातील सुमारे 50 हजार लोकांना सरकारी स्वस्त घरे हवी आहेत. देशातील मोठ्या औद्योगिक शहरात घरांचा प्रश्न तीव्र आहे. लोकांना खाजगी घरे परवडत नाहीत. त्यासाठी  2005 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग  यांनी नेहरू योजने अंतर्गत (JNNURM) परवडणारी घरे ही योजना केंद्र सरकारने जाहीर केली.

2007 साली पिंपरी चिंचवड शहरात घरकुल योजनेसाठी 13 हजार 252 लोकांनी अर्ज केले. मनपा आणि प्राधिकरण यांच्या लोकविरोधी धोरणामुळे योजना पूर्ण होण्यास 12 वर्षे लागली. अजूनही चिखली येथील प्रकल्पात इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. यातील 5 हजाराहून जास्त लोकांना घरे मिळू शकली नाहीत आणि मिळणारही नाहीत, असे ही दराडे म्हणाल्या.

दराडे पुढे म्हणाल्या, सरकारची स्वस्त घरकुल योजना मोडीत काढण्यासाठी बिल्डर लॉबी संबंधित राजकारणी, प्रशासकीय अधिकारी एकजूट करतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील घरकुल योजना गरीबांचे स्वप्नच राहिले आहे. भाडेकरू म्हणून जन्माला यावे आणि भाडेकरू म्हणून मरावे. 2008, 2017, 2020 या तिन्ही वर्षात गरीब महिलांनी घरांंसाठी रांगा लावलेल्या होत्या. प्रधानमंत्री आवास योजनेच्या सोडतीच्या वेळी लोकांनी केलेली गर्दी सरकारने लक्षात घ्यावी.

मनपा आणि प्राधिकरण यांची कार्यक्षमता प्रचंड आहे. त्यांनी वीस वर्षांपूर्वी एका महिन्यात बालेवाडीचे स्टेडियम बांधले होते. केंद्र आणि राज्य सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर पंतप्रधान आवास योजना पूर्ण होईल. प्राधिकरणाकडे हजारो एकर जमीन आहे. शहरातील गोरगरीबांसाठी निवारा उपलबद्ध करून देणे हे सरकारचे काम आहे. सरकार ही जबाबदारी पार पाडत नसेल तर अन्यथा घरासाठी मोठे आंदोलन उभे करावे लागेल, असे कॉम्रेड अपर्णा दराडे यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय