Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणक्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक, पुतळा पुन्हा आदरपूर्वक...

क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक, पुतळा पुन्हा आदरपूर्वक बसविण्याची बिरसा क्रांती दलाची मागणी

रत्नागिरी : चंद्रपूर महानगर पालिका हद्दीतील रेल्वे स्थानका नजीक महामानव क्रांतीसूर्य जननायक बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्यामुळे आदिवासी समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे. हटविलेला पुतळा पुन्हा त्याच जागी आदरपूर्वक बसविण्यात यावा,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत जिल्हाधिकारी चंद्रपुर व नगरविकास विभाग 2 यांस कार्यवाहीसाठी निर्देश देण्यात आले आहेत. सदर निवेदन सुशीलकुमार पावरा यांनी चंद्रपुर चे पालकमंञी विजय वडेट्टीवार, चंद्रपुरचे आमदार किशोर जोरगेवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, जिल्हाधिकारी चंद्रपुर व आयुक्त महानगरपालिका चंद्रपुर यांनाही पाठवले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी समाजाचं मान-सन्मान, आधारस्तंभ, ऋध्दास्थान महामानव क्रांतीसूर्य जननायक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे चंद्रपूर महानगर पालिकेने स्थापित पुतळ्याला हलविण्याचे काम केले. पुतळ्याची होणारी विटंबना तात्काळ थांबवावे व पुन्हा आदरपूर्वक जननायक बिरसा मुंडा यांना विराजमान करावे अन्यथा शांत संयमी आदिवासी समाज रस्त्यावर येऊन आंदोलन छेडेल, असा इशारा बिरसा क्रांती दलाने दिला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय