Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवारणा वार्षिक नियतकालिक अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

वारणा वार्षिक नियतकालिक अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

वारणानगर : यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचा “वारणा:२०२२-२३” शैक्षणिक वर्षाच्या नियतकालिक अंकाचे प्रकाशन श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे सावकर आणि मुख्य कार्यकारी संपादक प्रा. डॉ.प्रकाश चिकुर्डेकर यांच्यासह संपादक मंडळ सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम यांनी यावेळी प्रकाशनास शुभेच्छा दिल्या. नूतन प्राचार्य डॉ. ए.एम. शेख यावेळी उपस्थित होते. आमदार डॉ. विनय कोरे सावकर यांनी अंकाचे स्वागत करून संपादक मंडळाचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,”वारणा खोऱ्यातील आणि एकूणच ग्रामीण भागातील तरुणांच्या भावभावनांचे चित्र अंकाच्या माध्यमातून मांडण्याची संधी उपलब्ध होते, त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. समाजाशी संबंधित नवनवीन विषय आणि प्रश्नांची मांडणी साहित्यातून व्हावी”, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संपादक प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी अंकाबद्दल मनोगत व्यक्त करताना सांगितले की,”वारणा वार्षिक अंकामध्ये महाविद्यालयातील विविध घटना -प्रसंगांचे बोलके चित्र उभा केले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, साहित्य लेखनाबरोबरच छायाचित्रे, रेखाचित्रे, विविध समित्या, उपक्रमांचे अहवाल, मान्यवरांच्या भेटींची छायाचित्रे असा भरगच्च २५० हून अधिक पृष्ठांचा अंक दर्जेदार बनवण्यात यश प्राप्त झाले आहे. मुखपृष्ठावर ‘जी- २०’ परिषद आणि मलपृष्ठावर ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’, विषयांना स्थान देण्यात आले आहे.

गेल्या २५ वर्षात शिवाजी विद्यापीठाच्या नियतकालिक स्पर्धेत महाविद्यालयाच्या अंकांने सातत्याने पारितोषिके प्राप्त केली असून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ही यापूर्वीच्या अंकाला प्राप्त झाले आहे.” विद्यार्थ्यांनी शब्दबद्ध केलेल्या आणि रेखाटलेल्या रचनांना आकारबद्ध करण्याचे काम प्राचार्य (प्रभारी)डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, डॉ. एस. एस. जाधव, डॉ. सौ.पी. एस. आहुजा, प्रा. एम.एन. पाटील, प्रा. एम. बी. सणगर, डॉ. सौ. प्रीती शिंदे -पाटील, प्रा. सौ. वर्षा रजपूत यांनी केले आहे. यावेळी सर्वश्री डॉ. बी. टी. साळोखे, श्री. विश्वास जाधव, शुभम लठ्ठे, भालचंद्र शेटे उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय