Friday, December 27, 2024
Homeआरोग्यकोरोनानांदेड : 'एसएफआय - डीवायएफआय'च्या वतीने मास्क, सॅनिटाझरचे वाटप

नांदेड : ‘एसएफआय – डीवायएफआय’च्या वतीने मास्क, सॅनिटाझरचे वाटप

मुखेड : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मुखेड तालुक्यातील अंबुलगा येथे मास्क व सॅनिटाझरचे वाटप करण्यात आले.

सबंध जगभरासह आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोना लसीचा तुटवडा, राज्य व केंद्र सरकारामधील लसीवरून चाललेले राजकारण, हॉस्पिटलमधील अपुरी बेड्स क्षमता लक्षात घेता ग्रामीण भागातील त्याचबरोबर शहरातील सामान्य नागरिकांना आणखी एकदा जीवघेण्या लॉकडाऊनला सामोरे जाण्यापेक्षा जनतेमध्ये कोरोना संबंधात जनजागृती व्हावी, शारीरिक अंतर बाळगावे, मास्क आणि सॅनिटायझरचा सातत्याने वापर करावा, साबणाने स्वछ हात धुवावे, याबाबत जनजागृती करण्यात आली.

ही मोहीम तीन दिवस राबविण्यात येणार असल्याचे ही सांगण्यात आले. तसेच एका परिवारात जेवढे सदस्य तेवढे मास्क वाटप करण्यात येणार आहेत.

यावेळी बालाजी कलेटवाड, माधव देशटवाड, शंकर बादावाड, सुधाकर कांबळे, अजीज कुरेशी, माणिक गोनशेटवाड, पत्रकार पवन जगडमवार, अंबादास कांबळे, शंकर येरगे, शंकर मंत्री, प्रविण कल्याणपाड, माधव कलेटवाड, संजय गडमवाड, ज्ञानेश्वर कोमवाड आदींनी परिश्रम घेतले.


संबंधित लेख

लोकप्रिय