Friday, December 27, 2024
Homeआरोग्यनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात व जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन...

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात व जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा वाढविण्याची मागणी


बिरसा क्रांती दल आणि भिलिस्थान टायगर सेनेची मागणी

नंदुरबार : जिल्ह्यात कोविड- 19 ची गंभीर परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा वाढविणे व तपासणी डॉक्टर संख्या वाढविण्याची मागणी बिरसा क्रांती दल आणि भिलिस्थान टायगर सेनेने तहसीलदार तळोदा यांच्या मार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा कमतरतेमुळे जिल्हयात रुग्ण दगाविण्याचे प्रमाण वाढले आहे. ४० ते ५० टक्के ऑक्सिजन लेव्हल असणाऱ्या रुग्णांनाही केवळ दोन तास पुरेल एवढाच ऑक्सिजन लावला जातो. त्यानंतर पाच सहा तासानंतर ऑक्सिजन उपलब्ध होतो. काही वेळी उपलब्धही होत नाही, त्यामुळे रुग्ण दगाविण्याचे प्रमाण वाढले आहे. 

रेमडीसिवीर इंजेक्शनही वेळेवर मिळत नाही. तपासणी करणाऱ्या डॉक्टरची संख्या वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्यात रुग्णांचे, त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही लक्ष देऊन सहकार्य करण्याची गरज आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण करून काळाबाजार होतो का? यांचीही चौकशी करून दोषींवर कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

निवेनावर बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी, भिलिस्थान  टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष राजू प्रधान यांच्या सह्या आहेत.


संबंधित लेख

लोकप्रिय