Friday, December 27, 2024
Homeआरोग्यकोरोनाराजगुरूनगर तालुक्यातील आदिवासी भागात लवकरच कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत प्रांत अधिकारी...

राजगुरूनगर तालुक्यातील आदिवासी भागात लवकरच कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत प्रांत अधिकारी यांचे सकारात्मक आश्वासन

राजगुरूनगर : राजगुरूनगर तालुक्यातील आदिवासी भागात लवकरच कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत प्रांत अधिकारी यांचे सकारात्मक आश्वासन दिले.

अखिल भारतीय किसान सभा व काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ यांची राजगुरूनगर तालुक्याचे प्रांत अधिकारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.

कोविड-१९ चा अटकाव करण्यासाठी किसान सभा, राजगुरूनगर तालुका समितीने उपविभागीय अधिकारी यांना शुक्रवार दिनांक ७ मे, २०२१ रोजी  तालुक्यातील ग्रामीण, आदिवासी भागातील रुग्णांच्या आरोग्यासाठी व कोरोनासारखी महामारीच्या अटकावसाठी प्रशासनाने कृतिशील पाऊले उचलून कोरोनाचा वाढता प्रसार थांबवावा, यासह अन्य महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन दिले होते.

या निवेदनातील संघटनेने केलेल्या मागण्यांवर उपविभागीय अधिकारी विक्रम चव्हाण यांच्या सोबत किसान सभेचे पदाधिकारी, व कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यांनी दिनांक १० मे रोजी, सखोल व सकारात्मक चर्चा झाली.

या चर्चेवेळी उपविभागीय अधिकारी यांनी संघटनेने केलेल्या, खालील मागण्यांवर दोन दिवसांत निर्णय घेऊन त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

बैठकीतील सकारात्मक निर्णय पुढीलप्रमाणे :  

१. राजगुरुनगर तालुक्यातील, आदिवासी भागातील कुडे, वाडा, पाईट व डेहन्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत दोन दिवसांत कोविड-१९ ची रॅपीड टेस्ट सुरू केली जाईल.

२. तालुक्यातील आदिवासी भागात वाडा व पाईट या ठिकाणी कोविड सेंटर चालू करण्यासाठी दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल व शक्य झाल्यास ऑक्सिजन बेडची पूर्तता केली जाईल.

उपविभागीय अधिकारी विक्रम चव्हाण यांच्या समवेत चर्चेवेळी खेड तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय डोळस, किसान सभेचे अमोद गरुड, रज्जाकभाई शेख, विकास भाईक व संतोष बबनराव मदगे हे उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय