वेंगुर्ले (डॉ. कुंडलिक पारधी) : आडेली येथील दि. १४ रोजी घडलेली घटना समाजात चांंगला आदर्श घालून देणारी आहे.
सध्या सर्व जग कोरोनाशी लढा देत आहे. आजाराचे गार्भिय लक्षात घेता, प्रत्येक जण आपल्या जीवाला जपण्यासाठी. नाती गोती विसरत चालला आहे. अशा प्रसंगी आडेली ता. वेगुर्ला, सिंधुदुर्ग येथील एक सकारात्मक घटना घडली असून, हया घटनेमुळे समाजात एक चागला आदर्श घालून देण्याचे काम येथील आरोग्य सेवक शेखर देवेंद्र कांबळी आणि त्यांच्या टिमने केले आहे.
एक ८० वर्षाचे आजोबा हे कोरोना पॉझटिव्ह होते. त्यांचे कोरोनामुळे देहावसान झाले. परंतु घरात एकट्या आजी सोडल्या तर कोणीच नाही. अशा वेळी त्यांच्या अंत्यंविधी प्रश्न निर्माण झाला. तेव्हा कुठल्याही प्रकारचा विचार नकरता, वजराट येथील आरोग्य सेवक आणि बाळा सोनसुरकर, बाळू देसाई, सजय गावडे, प्रकाश डिचोलकर, नगराध्यक्ष गिरप, माजी सभापती बाळू परब यांनी अत्यंविधी विधी साठी लागणारी सर्व प्रकारची मदत केली.
तसेच प्रा. आ. केद्र आडेली येथील कर्मचारी रविंद्र कडव व डॉ. सजीवनी पाटील सुभाष सावंत यांनी पी. पी. टी. किट पुरवल्या त्यामुळे एका कुटुंबावर आलेले संकट सर्वांच्या सहकार्यातून टळले.