Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडरहाटणीतील पावसाळी पूर्व कामांचा माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी घेतला आढावा

रहाटणीतील पावसाळी पूर्व कामांचा माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी घेतला आढावा

नागरिकांची गैरसोय रोखण्यासाठी तातडीने कामे पूर्ण करण्याच्या प्रशासनाला सूचना

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर :
रहाटणी येथील पुरंदर कॉलनी परिसरात सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामाची माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनीपाहणी केली.यावेळी बळीराज कॉलनी, सिंहगड कॉलनी,सज्जनगड कॉलनी,साई कॉलनी मधील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशा सूचनाही अधिकारी व ठेकेदारांना दिल्या आहेत.



तसेच अनेक दिवसांपासून रहाटणी प्रभागातील अनेक भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रेशरने पाणीपुरवठा व्हावा यासाठी उपाययोजना कराव्यात व ही सर्व कामे पावसाळ्या पूर्वीच करण्यात यावे, अशाही सूचना प्रशासनाला करण्यात आल्या.

संबंधित लेख

लोकप्रिय