गोंदिया : एकीकडे महाविकास आघाडीची मुठ घट्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशात निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसलाच धक्क्यावर धक्के बसत आहेत. गोंदियात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीच्या गोंदियातील दोन नगराध्यक्षांनी आणि तब्बल पंधरा नगरसेवकांनी शिवसनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित ठाण्यातील निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला आहे.
मागील काही दिवसांपासून मविआला खिळखिळी करण्याचे काम भाजप आणि शिवसेना करत आहे. अशातच हा प्रवेश राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार आहे. मगील काही दिवसांपासून मविआला खिळखिळी करण्याचे काम भाजप आणि शिवसेना करत आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला.अशोक टेकवडे हे 2004 ते 2009 दरम्यान पुरंदर हवेलीचे आमदार राहिले आहेत. भाजप कडून राष्ट्रवादीचा गड जिंकण्यासाठी मिशन बारामती आखण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर टेकवडेंचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे.
पुणे येथे रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती
पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे येथील पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती
पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांची भरती