Friday, December 27, 2024
Homeग्रामीणसांगोल्यात लोकांसाठी कोविड रूग्णालय सुरू पण हे उशिरा सुचलेले शाहणपण - तुकाराम...

सांगोल्यात लोकांसाठी कोविड रूग्णालय सुरू पण हे उशिरा सुचलेले शाहणपण – तुकाराम शेंडगे

सांगोला (अतुल फसाले) : गेल्या दोन वर्षांपासून जो हा कोविड चालु होता, लोकांनी कसे दिवस ढकलून काढले हे फक्त त्यांनाच ठाऊक. कोरोनाचे संकट फार भयानक व रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत होते.

 या कालावधीत ह्या गोष्टी खर तर घडायला पाहिजे होत्या. या कोरोनाच्या संकटात प्रत्येक नागरिक हा स्वतःच तोडं देत होता, आणि देत राहिला. सांगोल्यातील काही परिवार असे आहेत ज्यानी आपले सर्व गमावले, बरोबर माणसं सुध्दा वाचली नाहीत. हाच तो मधला काळ होता ज्या काळात सांगोल्यातील जनतेसाठी मोफत उपचार  पद्धती उपलब्ध करून द्यायला हावी होती. परंतु सांगोल्याचा कारभारी कारभार सांभाळताना पुर्णत: फेल फक्त बोलण्यात आमदार दमदार नको तो कामात पण दमदार पाहिजे, अशी टिकाही शेंडगे यांनी केली आहे.

आमदार निलेश लंके सारखा एकाच रूग्णालयावर तुम्ही निर्भर राहता कामा नयेस प्रत्येक पंचवीस गावासाठी एक मध्यवर्ती रुग्णालय हावे, आयसोलेशन नव्हे उपचारासाठी रूग्णालय आणि अत्याधुनिक उपकरणे व डॉक्टर याची अवश्याकता असते. लोकप्रतिनिधीं व स्थानिक आरोग्य यंत्रणा हे आयसोलेशन केंद्रालाच रूग्णालय समजत आहेत. असो उशिरा का होईना रूग्णालय चालु केले, असेही ते म्हणाले.

नशीब महाराष्ट्र कोरोनामुक्त झाल्यावर उद्घाटन झाले नाही. अजुन थोड्या प्रमाणात कोरोना आहे. सांगोल्यातील तमाम जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतो. आपले घर जपा कोणी तुम्हाला मदत करणार नाही, प्रत्येक जण आपले घर बांधण्यात धन्यता मानतो, अशीही खोचक टिका केली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय