चीनच्या मदतीसाठी भारताच्या नौदल विमानाचे हिंदी महासागरात सर्च ऑपरेशन जारी
नवी दिल्ली : हिंदी महासागरात चीनचे भले मोठे मासेमारी जहाज बुडाले असून त्यातील ३९ खलाशी बेपत्ता आहेत. चीन सरकारच्या बंदर व नौकानयन विभागाने भारत सरकारला मदतीची विनंती केल्यानंतर नौदलाच्या P-81 या विमानाने ९०० सागरी मैल विशाल महासागरात तातडीने गस्त घालून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
लू पेंग युआन यू २८ या जहाजावर चीनचे ७ कर्मचारी ,१७ इंडोनेशियन,५ फिलिपिन्स नागरिक आहेत. हे मच्छिमारी जहाज असल्याची माहिती समोर आली असून दोन दिवसांपासून हे जहाज बेपत्ता आहे.
P-81 हे नौदलाचे आधुनिक जहाज असून महासागरातील आपत्कालीन मदतीसाठी हे विमान वापरले जाते .दरम्यान भारत, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स यांनी जहाजाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे मात्र त्यातील सर्व ३९ जण अद्यापही सापडलेले नाहीत.